Maharashtra Karnataka Border Dispute: मागील 10 दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात कट रचला जात आहे. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून बेताल वक्तव्य करण्यात येत आहे.महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली जात आहे. काल महाराष्ट्राच्या नागरिकांना बेळगावच्या सीमेवर मारहाण करण्यात आली. महाराष्ट्राच्या नागरिकांना झालेली मारहाण सहन करणार नाही.असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. लोकसभेत कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर त्यांनी हल्लाबोल केला.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्राच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेत गदारोळ झाला.
सुप्रिया सुळे यांनी सध्या सुरु असलेला कर्नाटक-महाराष्ट्र वादावर भाष्य करताच विनायक राऊत म्हणाले, एका राज्याच्या मंत्र्यांना प्रवेश करण्यास मनाई केली जाते. अशी बंदी घालणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अत्याचार, दडपशाही सुरू असल्याचे ही राऊत यांनी म्हटले.कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या अत्याचाराचा धिक्कार करत असल्याचे राऊत यांनी म्हटले.
हेही वाचा- सौंदत्ती डोंगरावर ST बसेसची सुरक्षा वाढवली
यावेळी कर्नाटकच्या खासदारांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या विरोधक अडचणीत आल्यावर हा मुद्दा उचलला जात असल्याचा दावा कर्नाटकच्या खासदारांनी केला. महाराष्ट्र-कर्नाटकत सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने संसदेच्या कामकाजातून काढण्याचे आदेश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले.


next post