Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादामुळे बंद करण्य़ात आलेली बस सेवा तब्बल 72 तासाने पुन्हा सुरु करण्यात आली आहे. आज कोल्हापुरातून बेळगावच्या दिशेने पहिली बस जाणार आहे. निपाणी, हत्तरगी आणि बेळगावच्या दिशेने ही बस सेवा होणार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात कन्नड वेदीका संघटनेकडून महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. यानंतर दोन्ही राज्यात सीमावाद चिघल्यामुळे बससेवा बंद करण्य़ात आली होती. प्रवाशांची होणारी ससेहोलपट पाहता प्रशासनाने आज बेळगाव बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


previous post
next post