Tarun Bharat

महाराष्ट्राने केलं धाडस, पण बससेवा पुन्हा बंद

महाराष्ट्रातील सीमा भागातील समन्वयक मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केल्यानंतर कर्नाटकातील कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली.दगडफेकीनंतर दोन्ही राज्यातून बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्राने धाडस करत 24 तासानंतर कोल्हापुरातून कर्नाटकात बससेवा आज सकाळी सुरू केली. निपाणी,संकेश्वर,हत्तरगीसह सर्व थांबे घेऊन बस बेळगावमध्ये पोहचणार होती. पण बस निपाणीपर्यंत पोहचली मात्र सुरक्षेततेच्या कारणास्तव ही बससेवा पुन्हा बंद करण्यात यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्याने पुन्हा बससेवा बंद करण्यात आली.पुन्हा बस बंद झाल्य़ाने प्रवाशातून नाराजी व्यक्त होत आहे.कन्नड रक्षक वेदिकेने (Kannad Rakshak vedike) महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना आक्रमक झाली होती. काल ठाकरे गटाने राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करत समन्वयक मंत्र्यांना बांगड्यांचा आहेर दिला.तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पोलीसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. दरम्यान दोन्ही राज्यातील बससेवा बंद असल्याने याचा फटका प्रवाशांना होत आहे. त्यातच सौंदती यात्रेसाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक मोठ्या प्रमाणात बसने जात असतात.आज सकाळी बस सुरु केल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्य़ात होते. मात्र पुन्हा बस बंद झाल्य़ाने प्रवाशातून नाराजी व्यक्त होत आहे.

Related Stories

शांताई वृद्धाश्रमात कोविड लसीकरण

Amit Kulkarni

जळगाव : डंपर-क्रूझरच्या भीषण अपघातात 10 ठार, 7 जखमी

prashant_c

रुक्मिणीनगर येथील कुटुंबांना तातडीने घरे द्या

Amit Kulkarni

देशातील हुतात्म्यांच्या आदर्शाची जपणूक करुयात..

Patil_p

वीज बिलासाठीच्या चक्काजाममध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – राजू शेट्टी

Archana Banage

कोविड-19 आजाराने मृत्युमुखी पडलेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

Archana Banage