तरुण भारत

युवराज संभाजीराजेंचा ‘डबल बार’ ! सर्वपक्षीयांची गरज अन् कोंडीही

कोल्हापूर/संजीव खाडे
राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे जाहीर करताना युवराज संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केल्याचेही घोषित केले. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात त्यांच्या आगामी वाटचालीबद्दल वेगाने चर्चा सुरू झाली आहे. सर्वपक्षीयांना विशिष्ट अंतरावर ठेवत संभाजीराजे यांनी त्यांची राजकीय गरज आणि राजकीय कोंडी केली आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून नजीकच्या काळात राजकीय पक्षाचाही पर्याय त्यांनी खुला ठेवला आहे. त्यामुळे त्यांचा डबल गेमरूपी डबल बार कसा प्रभावी ठरतो, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.


मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर विविध प्रश्नांवरून संभाजीराजे यांनी गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने रान उठविले. त्यामुळे समाजकारणात त्यांचे नेतृत्व प्रस्थापित आणि लोकमान्य झाले. मराठा समाजाची लाईन पकडताना त्यांनी शिव-शाहू विचाराचा जागरही केला. त्यातून त्यांनी आपण केवळ मराठा लीडर नाही तर बहुजन समाजातील प्रत्येक जाती, धर्माच्या प्रश्नावर लढणारा नेता असल्याचे बिंबविण्यात यश मिळविले. युगपुरूष शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज असल्याने संभाजीराजे यांना केवळ मराठा समाज नव्हे तर सर्व समाजात मान्यता आहे. 2016 मध्ये भाजपकडून राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्यत्वाची संधी मिळाल्यानंतर संभाजीराजे यांनी भाजपशी फारशी जवळीक ठेवली नाही. पण त्या पदाचा लाभ उठवित दुर्गराज किल्ले रायगडसह राज्यातील विविध किल्ल्यांच्या जनत, संवर्धनाचे प्रचंड मोठे काम केले. त्यासाठी पेंदाकडून निधी आपला. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या काही परवानग्या वर्षानुवर्षे मिळत नाहीत. त्या केवळ संभाजीराजेंमुळे मिळाल्या. दिल्लीच्या राजकारणात छत्रपती घराण्याचे वंशज म्हणून संभाजीराजे यांचे ग्लॅमर आहे. पंतप्रधान मोदींपासून सर्व मंत्र्यांकडे त्यांना सहज ऍक्सेस मिळतो. स्वच्छ चेहरा ही त्यांची ताकद आहे. राज्यसभेची खासदारकी भूषविताना त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी निधी दिला. कोल्हापूरला गॅस पाईप लाईनचा प्रकल्प आणला. कोरोना काळातही प्रभावी कामे केली. खासदारकीच्या काळात त्यांनी राज्यभरात संवाद यात्रांच्या माध्यमातून मराठा समाजाबरोबरच बहुजन समाजाशी संपर्क केला. पश्चिम महाराष्ट्राबरोबर विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक जिल्हय़ात संभाजीराजे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर त्यांचे पॉकेटस् निर्माण झाले आहेत. यामध्ये मराठा समाजातील मध्यम व गरीब वर्गाबरोबर बहुजन समाजातील इतर जाती, धर्माचेही लोक आहेत. स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यामागे संभाजीराजे यांचे मराठा प्लस बहुजन असे पॉलिटिक्स असणार हे स्पष्ट होते आहे.

Advertisements


सर्व पक्षीयांची गरज आणि कोंडीही
संभाजीराजे यांनी राज्यसभा अपक्ष म्हणून लढविण्याचा घेतलेला निर्णय आणि स्वराज्य संघटनेची स्थापना याकडे पाहिले तर त्यांनी चतुराईने सर्वच राजकीय पक्षांची गरज बनताना त्यांची कोंडीही केली आहे. राज्यसभा सदस्य असताना संभाजीराजे जरी भाजपपासून दूर राहिले तरी त्यांनी भाजपच्या कोणत्याही नेतृत्वाला दुखवले नाही. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती घराण्याच्या न्यू पॅलेसला दिलेली भेट अराजकीय नक्कीच नव्हती. शरद पवार यांनी काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा करून संभाजीराजेंबाबत निर्णय होईल, असे सांगत मदतीचे संकेत दिले होते. मराठा आरक्षण लढय़ाच्यावेळी झालेल्या भेटीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याशीही संभाजीराजेंचे सौदार्हपूर्ण संबंध आहे. सर्वपक्षीयांशी जवळीक करताना त्यांना योग्य अंतरावर ठेवत आपली ताकद त्यांनी दाखविली आहे. त्यातून राज्यसभेच्या पटावर त्यांनी फासे टाकले आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि विरोधी भाजप हे सत्ताधारी व विरोधी पक्ष एकत्रित  उमेदवार निवडून येत नाही. अशा स्थितीत अर्थपूर्ण घडामोडी होऊ शकतात. त्यामुळे संभाजीराजे यांच्यासारख्या स्वच्छ चेहऱयाला मदत केली तर तोटा नाही तर फायदाच आहे, याची जाणीव राजकीय पक्षांना आहे, हे संभाजीराजे जाणतात. त्यातून त्यांनी ही राजकीय खेळी केली आहे. त्याला यश मिळणार की नाही हे जून महिन्यात कळेल. मात्र सध्या तरी राजकारणात संभाजीराजेंची चर्चा सुरू झाली आहे हे निश्चित.


मोदी, शहा, फडणवीस यांच्याबरोबर स्नेह कायम
खासदारकी दिल्याबद्दल संभाजीराजे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती असणाऱया गुजरातमधील खासदार रामभाई मोकरिया यांची भेट घेऊन आभार मानताना वेगळा राजकीय सौदाहर्य़ाचा संदेशही दिला होता. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या प्रती ऋण व्यक्त केले. त्यातून राजकारणापालिकडे जावून नातेही जपले.

Related Stories

महाराष्ट्राने लसीकरणात ओलांडला दीड कोटींचा टप्पा : आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

इचलकरंजीत ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत २४९ वाहन चालकांवर कारवाई

Abhijeet Shinde

देशात 24 तासात 2.17 लाख नवे रुग्ण

datta jadhav

ग्रामीण रुग्णालयांना एक कोटींची वैद्यकीय उपकरणे-पृथ्वीराज चव्हाण

Patil_p

पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 1,50, 745 वर

Rohan_P

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 10,320 नवे कोरोना रुग्ण; मृतांचा आकडा 14,994 वर

Rohan_P
error: Content is protected !!