Tarun Bharat

नवरीसारखा वर्षा बंगला सोडला; संदिपान भुमरेंची उद्धव ठाकरेेेंवर बोचरी टीका

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

Sandipan Bhumre On Uddhav Thackeray : पक्षात बंड झाल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष पेटलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता इतर नेत्यांनीही थेट उद्धव ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे आणि इतर काही आमदारांनी सूरत गाठले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत देताना वर्षा बंगला सोडत असल्याचे सांगितले होते. शिंदे गटाने चर्चेसाठी मुंबईत यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडला. उद्धव यांनी वर्षा बंगला सोडण्याच्या निर्णयावरही भुमरे यांनी जोरदार टीका केली. वर्षा बंगला सोडला तेव्हा एखादी नवरी कशी घर सोडते, तसे सोंग केले असल्याची बोचरी टीका भुमरे यांनी केली.

अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, एखादी नवरी घर सोडताना ज्या पद्धतीनं सोंग करते, तसंच सोंग ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताना केलं. आम्ही भेटायला जायचो तेव्हा ते मास्क लावायचे. आता सरकार गेलं, खुर्ची गेली आणि मास्कही गेला. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते फक्त टिव्हीवरच दिसायचे, असं म्हणत भुमरेंनी थेट ठाकरेंवर टिकास्त्र सोडलं आहे.

Related Stories

मराठा आरक्षणाबाबत राज्य विधीमडंळानं घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Archana Banage

अश्वगंधा’ वनस्पती पोहचली आंतरराष्ट्रीय पातळीवर

Patil_p

पंतप्रधान मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण अधिक आवडतो: खासदार मुंडे

Archana Banage

मुंबईत कार्यरत असलेल्या चिंचणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

Archana Banage

नागरिक व नगरसेवक यांच्यातील संवाद महत्वाचा : मुरलीधर मोहोळ

Tousif Mujawar

आयआयटी मद्रास सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

Amit Kulkarni
error: Content is protected !!