Tarun Bharat

Monsoon Update : राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार एंट्री ,तर वीज कोसळून दोन मुलींचा मृत्यू

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबईसह (Mumbai) पुणे, कोल्हापूर (Kolhapur) , सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात दमदार बॅटींग केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा- संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि…; विश्‍वजित कदम

यंदा मान्सून वेळाने दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी १०० मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तर दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.पुढील दोन-तीन दिवसांत विदर्भात मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र पुढील सुमारे पाच दिवस राज्यात काही भागांतच हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. .

हेही वाचा- राहुल गांधींची तिसऱ्या दिवशीही चौकशी


काल सांगली शहरासह परिसात पावसानं जोरदार बॅटिंग केली. या पावसामुळे शेतीकामांना वेग येणार आहे. चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर खरीप हंगाम सुरु होण्याअगोदर हिंगोली शहरासह ग्रामीण भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात इनापुर शेतशिवारात वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात एका 15 वर्षीय युवतीचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान चंद्रपूरातही कापूस पेरणीसाठी शेतात गेलेल्या मुलीचा वीज कोसळून मृत्यू झाला.

Related Stories

नगरमध्ये तोतया कमांडोला अटक

datta jadhav

उर्मिला मातोंडकरांच्या पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; पंकजा म्हणाल्या

Archana Banage

शासकीय कर्ज योजनांच्या ग्राहकांना त्रास देऊ नका

Patil_p

मिरजेत अडीच कोटींचे लाल चंदन जप्त

Archana Banage

कुलकर्णी, टिळकांनंतर आता नंबर बापटांचा?

datta jadhav

प्रतापगड भागात आढळला बारा फूट लांबीचा अजगर

Patil_p
error: Content is protected !!