Tarun Bharat

…तर महाराष्ट्र पेटेल; बाळा नांदगावकर यांचा सरकारला इशारा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) आणि मनसेते ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं. या धमकीच्या पत्राबाबत बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे(state home minister dilip walse patil) यांची भेट घेतली. मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त वाडके यांची भेट घेतली. तसेच गृहमंत्री वळसे पाटील यांनी यासंबंधी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं. या पत्रात राज ठाकरे यांना धमकी देण्यात आली आहे. यावर “हे पत्र कोणी लिहलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. माझं ठिक आहे, पण राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल” असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे याची दखल राज्य सरकारने घ्यावी’. तसेच वारंवार मी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागतोय याची राज्य आणि केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी.”

या पात्रात “अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू,” असं लिहिलं असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

त्यांनी त्यांचे काम केलं आम्ही आमचे काम करणार
राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असून त्यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (brij bhushan singh) विरोध करत आहे. यांनी बृजभूषण कोणत्याही परिस्थितीत ते राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, २००८ साली राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय नागरिकांवर केलेल्या हाणामारीबाबत त्यांनी माफी मागावी अशी मागणी करत आहेत. तसंच, त्यांनी माफी नाही मागितली तर, त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असं त्यांनी काल काढलेल्या रॅलीदरम्यान म्हटलं. यावरही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यांनी त्यांचे काम केलं आम्ही आमचे काम करणार’ असं त्यांनी सांगितलं.

Related Stories

Ratnagiri : मुख्यमंत्र्यांनी दापोली दौराही केला असता तर बरे झाले असते

Abhijeet Khandekar

तर आता भाईगिरी दाखवा; संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Archana Banage

राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जूनला मतदान

datta jadhav

Tokyo Olympics 2020: बॉक्सर पूजा राणीची उपांत्यपूर्व फेरीत धडक, दीपिका कुमारीही विजयी

Archana Banage

बडगाम चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

सातारा : राष्ट्रवादी कार्यालयावर अज्ञातांकडून दगड फेक

Archana Banage