Tarun Bharat

कोल्हापूर पूरक्षेत्रातील १०९ इमारतींना नोटीस, आयुक्तांचा सूचना

कोल्हापूर- पूर क्षेत्रातील १०९ इमारतींना पावसाळय़ापूर्वी लाईफ जॅकेट, बोट अशा सुविधा कार्यन्वीत करण्याचे आदेशाच्या नोटीस बजवण्यात आल्या आहेत. तसेच नाले परिसरातील खासगी ८० मिळकतींच्या अनाधिकृत बांधकामांना नोटीस दिल्या आहेत. मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी संभाव्य पूर परिस्थीतीचा धोका लक्षात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे नगररचना विभागाच्यावतीने सोमवारी ही कारवाई केली.


पाटबंधारे विभाग कोल्हापूर उत्तर यांच्याकडून ०६ डिसेंबर २०१९ रोजी कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीलगत अंतिम निळी, लाल व हिरवी पूररेषा निश्चीत करून त्याचे नकाशे प्रसिध्द केले आहेत. मान्सुनपूर्व आढावा बैठकीमध्ये प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नियंत्रण क्षेत्रामध्ये २०२१ ची पूरपरिस्थिती विचारात घेवून नियंत्रण, सतर्क क्षेत्रामधील रहिवास, वाणिज्य वापराचे प्रकल्पांकरीता सुरक्षतते कामी लाईफ जॅकेट, रेसक्यु बोट, इमर्जन्सी लाईट आदी. सुविधा पावसाळयापूर्वी कार्यान्वित करून घेणे बाबत आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने शहरातील पूरक्षेत्रातील १०९ इमारतींना नगरचना विभागाने नोटीस बजावल्या असून पूराच्या पार्श्वभूमीवरील सुविधा उपलब्ध ठेवल्याबाबतच अहवाल मनपाला देण्याचे म्हटले आहे. याचबरोबर ९० नाले परिसरातील अतिक्रमण केलेल्या खासगी मिळकतींनाही नोटीस बजावली आहे. यामध्ये अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पूरक्षेत्रातील मिळकतींना या सुविधा ठेवाव्या लागणार
-लाईफ जॅकेट (प्रति १० चौ.मी.बांधकाम क्षेत्राकरीता १ जॅकेट)

  • रेसक्यु बोट (२० हून अधिक सदनिका असणाऱया इमारतीस)
  • इमर्जन्सी लाईट
  • ट्रान्सफॉर्मर, पाण्याच्या टाक्या, सांडपाणी प्रक्रिया केंद्र महात्त्म पूर पातळीवर बसाविणे.

Related Stories

पंचगंगा जलसमाधी परिक्रमा 1 सप्टेंबरपासून; राजू शेट्टी यांची माहिती

Archana Banage

कोल्हापूर : विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा 17 पासून

Archana Banage

नागपूरची नाही तर धुळ्याची जागा बिनविरोध

Archana Banage

शरद साखरचे आगामी गळीतात सात लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट

Archana Banage

पुणे विभागात 1 हजार 70 क्विंटल अन्नधान्याची आवक : डॉ.दीपक म्हैसेकर

prashant_c

शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना १९८२ ची पेन्शन योजना लागू करा

Archana Banage