Tarun Bharat

राज ठाकरे बुडताना किनाऱ्याकडे बघतील तेव्हा शिवसेना दिसेल- नीलम गोऱ्हे

Advertisements

कोल्हापूर- वाचण्यासाठी हातपाय मारण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. तसेच पक्ष वाचवण्यासाठी राज ठाकरे असा प्रयत्न करत आहेत. पण त्याचा उपयोग करून घेतला जात आहे. पण किनाऱ्याकडे जेव्हा बघतील तेव्हा शिवसेनेशिवाय त्यांना काही दिसणार नाही. कारण बाकीचे लोक त्यांना पाण्यात ढकलून त्यांचा गेम करण्यासाठी हे राजकारण करत आहेत

कोविडच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडकाळात मार्गदर्शन केले. मात्र त्या कामाकडे दुर्लक्ष करून तोंडावर धुराळा उडवण्याचा काम काही लोकांकडून सुरू आहे. वेळोवेळी ठाकरे कुटुंबीय शिवसैनिकांशी संवाद साधतच असतात. पण काही लोकांची वृत्ती फक्त खडे मारण्याचे असते. ते आयुष्यात दुसरे काही काम करू शकत नाहीत. अशी उपद्रवी वृत्ती काही लोकांची दिसते. मात्र त्याला उद्धव ठाकरे कामांमधून उत्तर देतील. भाजपचा मुख्यमंत्री कसा होता. हे जनतेने पहिले आहे.जे अहंकारात होते, त्यांचा भ्रमनिरास झालाय. असा टोला गोऱ्हे यांनी फडणवीस यांना लगावला आहे. आपल्या कर्माचे उत्तर जनता देत असते. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्यांना दृष्टिदोष झाला असेल. सैरभैर झाल्यासारखी यांची वृत्ती आहे. अशा शब्दात गोऱ्हे यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईत झालेल्या सभेवर नीलम गोऱ्हे यांनी निशाणा साधला आहे. भाजप सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. मात्र स्वतःच्या सहकाऱ्यांना राज्याबाहेर घालवण्याची वेळ तुम्ही त्यांच्यावर आणली. दुसऱ्याच्या घरातील वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न तुमचा आहे, असा टोला गोऱ्हे यांनी लगावला.

राणा दाम्पत्यावरून बोलताना गोऱ्हे यांनी, अधिकृतरीत्या पेशंटच्या तपासणी होताना त्याचे फोटो कधीही काढले जात नाहीत. फोटो स्टुडिओ लीलावती हॉस्पिटलमध्ये असावा अशा पद्धतीचे फोटो कोणाचे काढले नसतील, असे फोटो काढून ते व्हायरल करण्यात आले. पण राणा दाम्पत्याकडून प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल केले जात आहे. असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यास त्याला प्रसिद्धी मिळत नाही. हे त्यांनी ध्यानात ठेवावे. विकासाचा अजेंडा वरून लक्ष वळवण्यासाठी हे सुरू आहे. असेही म्हणाल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून बोलताना ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राज ठाकरेंनी बऱ्याच प्रकारे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. अनेकवेळा झेंडा बदलला, भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन झाला. आता परत ते हिंदुत्वाकडे वळले आहेत. हातपाय मारण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो. तसेच पक्ष वाचवण्यासाठी राज ठाकरे असा प्रयत्न करत आहेत. पण त्याचा उपयोग करून घेतला जात आहे. पण किनाऱ्याकडे जेव्हा बघतील तेव्हा शिवसेनेशिवाय त्यांना काही दिसणार नाही. कारण बाकीचे लोक त्यांना पाण्यात ढकलून त्यांचा गेम करण्यासाठी हे राजकारण करत आहेत. असेही गोऱ्हे म्हणाल्या.

Related Stories

सातारा : आज एक कोरोनाबाधित तर एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

गडहिंग्लजमधील बहीण-भाऊ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

तैवानला चीननं चारही बाजूंनी घेरलं; हवाई, जलमार्गावर नाकाबंदी

datta jadhav

“घोषणाबहाद्दर” मंत्री वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा : आमदार पडळकर

Abhijeet Shinde

लातूरजवळ झालेल्या अपघातात दोघे जण ठार

Sumit Tambekar

कोल्हापूर कचरा घोटाळ्यातील अधिकाऱ्यांना बडतर्फ करा

Sumit Tambekar
error: Content is protected !!