Tarun Bharat

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला स्थगिती

ऑनलाईन टीम/तरुण भारत

Maharashtra Police Recruitment 2022 : राज्यात नोव्हेंबरमध्ये १४,९५६ पदांसाठी होणारी पोलीस भरती (Police Recruitment) पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. पण या भरतीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात भरतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्य सरकारनं नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली आहे. १ नोव्हेंबरपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल १४,९५६ पदांसाठी भरती होणार होती. पण भरतीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देत पुढील आठवड्यात भरतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला सराव कायम ठेवावा. तसेच मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. त्यामुळे वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकज या भरतीस पात्र नव्हते. त्यामुळे वयोमर्यादा वाढीचाही निर्णय यामध्ये होण्याची शक्यता आहे. तर प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

‘मी धमक्यांना भीक घालत नाही, माझं काम सुरूच ठेवणार’

Archana Banage

राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने राजकारण नको!

Archana Banage

निवडणुकांच्या चर्चांना आयुक्तांनी दिला पूर्णविराम!

Archana Banage

मदन शर्मा मारहाण प्रकरण : ‘त्या’ 6 शिवसैनिकांना पुन्हा अटक

Tousif Mujawar

एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना; राज्यपालांना भेटणार

Archana Banage

कोविड -19 च्या प्रतिकारासाठी पडद्यामागील कलाकारांना रोगप्रतिकारक वस्तूंचे वाटप

datta jadhav