Tarun Bharat

दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? दिपाली सय्यद

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. त्यातच काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भावनिक साद घातल्याने शिवसैनिकांसह सर्वसामान्य जनताही भावूक झाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) तर दुसरीकडे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)असं समीकरण झाले असताना मात्र शिवसैनिकांना कोणासोबत राहायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसैनिक अस्थिर झाले आहेत. दरम्यान अभिनेत्री, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनीही ट्विट करत आपली भावना व्यक्त केली आहे. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी असे ट्विट त्यांनी केलं आहे.

काय म्हणाल्या दिपाली सय्यद
सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करु असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांना टॅग केलं आहे.

हेही वाचा- बंडखोर आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले, बडव्यांनी तुम्हाला घेरलं…

दिपाली सय्यद यांनी काल ही एक ट्विट केलं होत यात त्या म्हणतात, माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे.
आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल असेही त्या म्हणाल्या.

Related Stories

ममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन; मतदानावेळी गडबड होत असल्याचा आरोप

Abhijeet Shinde

धोका वाढला : लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी नाशिकमधील बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी

Rohan_P

MPSC ची १५ हजार ५१५ पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता- अजित पवार

Abhijeet Shinde

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्‍सी गायब

Abhijeet Shinde

नाकात घुसलेले कोरोना विषाणू तयार करतात एक कोटी प्रतिकृती

datta jadhav

कर्नाटक: “राज्य सरकारकडून मुस्लिम समाजाला वाईट वागणूक”; भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!