Tarun Bharat

चुना कसा लावायचा हे वेळ आल्यावर दाखवेन ; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसनेच्या बंडखोर आमदारांविरोधात बोलताना खासदार संजय राऊत यांनी वापरलेल्या वादग्रस्त विधानांबरोबरच आक्षेपार्ह भाषेवरुन एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच बंडखोर आमदारांपैकी एक असणाऱ्या गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राऊतांच्या टीकेचा शेलक्या शब्दांमध्ये समाचार घेतलाय.

गुलाबराव पाटील यांना पानटपरीवर पाठवू असं राऊत यांनी म्हटलं होतं. यावर आता गुलाबराव पाटील यांनी प्रतिहल्ला केला आहे. गुवाहाटीमधून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात गुलाबराव पाटील हे भाषण करताना दिसत आहेत. यात गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, मला टपरीवर पुन्हा पाठवू संजय राऊत सांगतात. चुना कसा लावतात माहिती नाही त्यांना अजून. वेळ येईल तेव्हा मी लावेल त्यांना चुना. आपण इथं कसे कसे आलो आहोत हे सांगण्याची गरज नाहीय पण आता आपल्याला एकत्रितपणे ही लढाई लढायची आहे, असं ते म्हणाले. आम्ही आमच्या घरी तुळशीपत्र ठेऊन काम केलेले लोक आहोत. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबावाले नाही आहोत आम्ही, असा टोला देखील गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

१९९२ च्या दंगलीमध्ये आम्ही तिघं भाऊ आणि बाप तुरुंगामध्ये होतो. त्यावेळेस संजय राऊत कुठे होते माहिती नाही. ५६ ब काय असतं हे संजय राऊतांना माहिती नाही. ३०२ काय असतं माहिती नाही. पण आम्ही ही सगळी भोगलेली आहेत,” असं गुलाबराव यांनी म्हटलंय. “तडीपार काय असतं हे त्यांना माहिती नाही, दंगलीच्या वेळेस पायी चालणं काय असतं हे त्यांना माहिती नाहीय,” असंही ते म्हणालेत.

गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, आपल्यावर जिल्ह्यामध्ये, मतदारसंघात आरोप प्रत्यारोप होतायत. पण ते होत असतानाच बऱ्याच पद्धतीने लोक सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहत आहेत. दोन्ही प्रकार सुरु आहेत. आपल्यावर तर भरपूर टीका झालीय. पदं काढून घेऊ, तुमचे बाप किती… आता आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहिती नाहीय, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री ५२ आमदार सोडायला तयार पण शरद पवारांना नाही
त्यांनी वर्षा सोडलं, आपल्या ५२ आमदारांना सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत. आम्हीसुद्धा त्यांच्याकरिता भरपूर केलेलं आहे. आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाहीत, असा टोला शिंदे गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांनी गुवाहाटीतील ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये इतर आमदारांना संबोधित केलंय, त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे

error: Content is protected !!