एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. ज्यामध्ये राजकीय चर्चाही झाल्याची माहिती समोर आलीय. शिंदे यांनी पुन्हा त्यांना काॅल केल्याने ते मनसे गटात सामील होणार का अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आले आहे. त्यातच आज १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज सुनावणी होणार आहे. यामध्ये निकाल काय लागेल याची प्रतिक्षा संपूर्ण देशाला लागली आहे.
हेही वाचा-ठाकरे सरकारच्या सत्तेला सुरूंग लावणारा एकनाथ शिंदे गट थेट सर्वोच्च न्यायालयात, आज सुनावणी
राज ठाकरे यांना शनिवारी रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आलायं. शस्त्रक्रियेनंतर घरी परतल्याचं राज यांनीच ट्विटरवरुन जाहीर केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी थेट राज यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीसंदर्भातील माहिती घेतली.या फोन कॉलदरम्यान शिंदे यांनी राज ठाकरेंना राजकीय घडामोडींसंदर्भातील माहिती देताना आपली बाजूही सांगितल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय.
हेही वाचा- राजेंद्र पाटील-यड्रावकरांच्या समर्थनात जयसिंगपुरात कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन
शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागणार आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. सध्या शिंदे यांच्याकडे संख्या असली तरीही, 16 आमदारांवर कारवाईचा बडगा आहे. यामुळे शिंदे गटाकडून मनसेचा पर्याय आजमावण्याचा विचार होऊ शकतो.
बंडखोरांसमोर नवा पर्याय? एकनाथ शिंदेंनी केला राज ठाकरेंना दुसऱ्यांदा फोन
Advertisements