ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Maharashtra power struggle hearing postponed again महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे आज रजेवर असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, पुढची सुनावणी कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
सुभाष देसाई यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार होती. दरम्यान, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आज रजेवर असल्याने आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
अधिक वाचा : WHO कडून ‘मंकिपॉक्स’चे नामांतर; ‘हे’ असेल नवे नाव
दरम्यान, मागील सुनावणी एक नोव्हेंबरला झाली होती. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं होतं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना तीन आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर आज होणारी सुनावणी राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या दृष्टीनं निर्णायक ठरण्याची शक्यता होती. मात्र, ही सुनावणी लांबणीवर पडली. पुढची सुनावणी कधी होणार याबाबत स्पष्टता झालेली नाही.