Tarun Bharat

मुंबईसह पुण्याला पावसाने झोडपले; पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Advertisements

Maharashtra Rain Update : राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस पडत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणांना पावसाने झोडपले आहे. वाढलेल्या पावसाच्या जोराने नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मागील २४ तासात जोरदार वाढलेल्या पावसाने पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरुन दिली माहिती दिली आहे.

कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातवरुन महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजेच दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकत असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचं सांगितलं जात आहे. अरबी सुद्रातून बाष्पाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने मागील आठवड्यातही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार सरी कोसळल्या होत्या. मात्र यंदाच्या मौसमातील पावसाचा शेवटचा जोर असेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईसह पुण्याला पावसाने झोडपले
मुंबई आणि पुण्य़ात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत मध्य आणि पश्चिमची लोकल सेवा आज उशिरा सुरु होणार आहे. तर पुण्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने भिडे पूल परिसरत पाणी आले आहे. पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद केली आहे.

हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरुन दिली माहितीके. एस. होसाळीकर यांनी ट्विटमध्ये काय म्हटलय
मुंबईमधील अंधेरी, गोरेगाव, सांताक्रुझ, पवई आणि खारमध्ये सकाळपासूनच मुसळधार सरी बरसत आहेत. मुंबईमध्ये आज मोठ्याप्रमाणात पाऊस पडले असा इशारा हवामान खात्याने कालच जारी केला आहे. दिवसभरामध्ये पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात ट्विट करताना पुढील तीन ते चार तास मुंबई आणि ठाण्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

“मुंबईकर आणि ठाणेकरांनी आज प्रवास करताना काळजी घ्यावी. पुढील तीन ते चार तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. सकाळी ९ वाजताच्या रडारवरील हवामानाच्या अंदाजानुसार मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील २४ तासात जोरदार पाऊस पडल्याचं दिसत आहे. पुढील ४८ तास (दोन दिवस) मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे,” असं होसाळीकर म्हणाले आहेत.

Related Stories

अन्यायी कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर

Archana Banage

रत्नागिरी जिल्ह्यात चौदा पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

गोल्फ क्लब चौक उड्डाणपुलाचे काम मार्च 2022 मध्ये पूर्ण होणार

Tousif Mujawar

सीपीआर मधील डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या त्वरीत थांबवा भाजपाची जोरदार निदर्शने

Abhijeet Khandekar

“आपण त्यांना माघारी जाण्यास भाग पाडलं”; शेतकरी नेत्याचा व्हिडीओ व्हायरल

Abhijeet Khandekar

पाचवी बैठक निष्फळ; कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम

datta jadhav
error: Content is protected !!