Tarun Bharat

समीर वानखेडे जन्माने मुस्लिम नाहीत; जात प्रमाणपत्र समितीकडून क्लीनचिट

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मोठा दिलासा दिला आहे. धर्म लपवून एका मागासवर्गीयाचा अधिकार हिसकावून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या आरोपाप्रकरणी तपास केल्यानंतर जात पडताळणी समितीने समीर वानखेडे हे जन्मत: मुस्लीम नसल्याचे म्हणत त्यांना क्लीनचिट दिली.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा प्रमाण पत्र समितीकडे गेले होते. यानंतर अखेर समीर वानखेडेंच्या बाजूने निकाल लागला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे म्हणत तसे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे समितीने ही तक्रार फेटाळली आहे.

याप्रकरणी जात पडताळणी समितीनी ९१ पानांचे आदेशपत्र काढले आहे. समितीने समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र देखील कायम ठेवले आहे. समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्म स्वीकारला नसल्याचेदेखील म्हणत ते अनुसूचित जाती (महार-३७) प्रवर्गातील असल्याचे या समितीने सांगितले आहे. दरम्यान, जात पडताळणी समितीने काढलेल्या या निष्कर्षानंतर समीर वानखेडे यांनी एक ट्वीट करून सत्यमेव जयते अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

टोळधाड : पुढील चार आठवडे भारताला अतिदक्षतेचा इशारा

datta jadhav

श्री.छ. सौ.चंद्रलेखाराजे अनंतात विलीन

Patil_p

Irrigation Scam: अजित पवारांच्या अडचणी वाढणार? माजी जलसंपदा अभियंत्याचा मोठा आरोप

Archana Banage

नाशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना सुट्टी द्यावी : आ. गोपीचंद पडळकर

Archana Banage

कबनूर येथे आढळला पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

गुजरातमध्ये राजधानी एक्सप्रेस उलटविण्याचा प्रयत्न फसला

datta jadhav
error: Content is protected !!