ऑनलाईन टीम/तरुण भारत
काल मुंबईत असणारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rrajendra Patil Yadravkar) यांनी शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ते काल विमानतळावर दाखल होत त्यांनी थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे. त्यांचा हा व्हिडीओ तरुण भारत च्या हाती लागला असून त्यामध्ये त्यांनी निळ्या रंगाचा शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील (Sanjay Patil)हे गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते त्यानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.