Tarun Bharat

दहावीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींनी मारली बाजी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (SSC Board) घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. यंदा मात्र दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून बोर्डाच्यावतीने निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुपारी १ नंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी


राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थी

उत्तीर्ण विद्यार्थी
15 लाख 21 हजार 003

राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

कोकण विभागात सर्वाधिक 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सर्वाधिक कमी निकाल

नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका



Related Stories

आग्रा : तानाजीनगर तीन दिवस पूर्ण बंद; विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर होणार कारवाई

Tousif Mujawar

राज ठाकरेंच्या अटक वॉरंटवर सुनावणी पूर्ण, शुक्रवारी होणार फैसला

Archana Banage

कुमारस्वामी यांनी सांगितली माजी पंतप्रधान देवेगौडांची अखेरची इच्छा, म्हणाले…

Abhijeet Khandekar

उदयनराजेंविरोधात शिवेंद्रराजेंचा उमेदवार

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; महामार्गासह 200 रस्ते बंद

datta jadhav

कोरोनामुक्त व्यक्तीचे रक्त विकलं जातंय कोटीच्या भावात

Archana Banage