Daulatabad Fort : ‘महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक’ म्हणून ओळखला जाणारा दौलताबाद किल्ला हा वास्तुशिल्पाचा एक चमत्कार मानला जातो. १२ व्या शतकात बांधल्या गेलेला हा किल्ला देवगिरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. औरंगाबाद शहरापासून 15 किमी अंतरावर असलेला आणि प्राचीन तटबंदी असलेला देवगिरी किल्ला उंच कड्यावर मधोमध वसलेला आहे.
अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेत पहिले पाऊल दौलताबाद किल्ल्यावर ठेवले होते. एकेकाळी हा किल्ला यादव साम्राज्याची राजधानी होता. 1318 मध्ये हरपालदेवाला अल्लाउद्दीन खिलजीने मारले आणि किल्ल्याचा ताबा घेतला. या किल्ल्यावर खिलजी, तुघलक, बहामनी, मुघल आणि निजाम याच्या स्थापत्यकलेचा प्रभाव आढळतो.


1327 मध्ये मोहम्मद तुघलकने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणल्यावर ‘देवगिरी’चे नाव ‘दौलताबाद’ झाले. या किल्यावर शेवटपर्यंत निजामाचे स्वातंत्र्य होते. १९४७ च्या भारतीय स्वातंत्र्यानंतर निजामाच्या पाडव होऊन 1950 मध्ये देवगिरीला स्वातंत्र्य मिळाले.


या किल्ल्याचे वैशिष्ट्यपुर्ण स्थान ही या किल्लाची विषेश ओळख आहे. किल्ल्याच्या शिखरावरून आपण संपूर्ण शहराचे मंत्रमुग्ध करणारे आल्हाददायक परिसर पाहू शकतो. हा किल्ला सर करण्यासाठी तब्बल 750 पायर्या चढाव्या लागतात. ७५० पायऱ्या चढून वरून खाली दिसणारे विलोभनिय दृश्य पाहणे एक अद्भुत गोष्ट आहे.
मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक समजला जाणार हा किल्ला 200 मीटर उंच शंकूच्या आकाराच्या टेकडीवर बांधला आहे. उंच टेकडीवर असलेल्या याच्या उपस्थितीमुळे किल्ल्याला सामरिक स्थिती, स्थापत्य सौंदर्य आणि शत्रूंपासून अभेद्य संरक्षण प्राप्त होते.


देवगिरी किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्थापत्यकला. देवगिरी किल्ल्याच्या स्थापत्त्यशास्त्रामुळे शत्रूच्या विरूद्ध अभेद्य संरक्षणच तर मिळालेच शिवाय पाण्याच्या स्त्रोतांचे व्यवस्थापन देखील उत्कृष्टरित्या केले आहे. औरंगाबादच्या हिरव्यागार पठारावर या किल्ल्याचा विरोधाभास एक वेगळेच चित्र निर्माण करतो.


देवगिरीचा किल्ला हा देशातील सर्वात सुरक्षित किल्ल्यांपैकी एक मानला जातो. शंकूच्या आकाराच्या टेकडीच्या माथ्यावर स्थित असलेला हा किल्ल्याचा खालचा भाग खंदकाने वेढला आहे. हे खंदक पुर्वी मगरींनी भरले होता. या मगरींमुळे या किल्ल्याचे संरक्षण केले जात होते.


संपूर्ण किल्ला अनेक बुरुजांनी संरक्षित असून तुघलक राजवटीच्या काळात ते आणखी मजबूत झाले. या वास्तूचे संरक्षण करण्यासाठी 5 किलोमीटर लांबीची मजबूत भिंत बांधण्यात आली असून अज्ञात व्यक्तींना प्रवेश रोखण्यासाठी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर अनेक भूलभुलैया आणि विविध प्रकारची कोडी तयार केल्या आहेत.


तुघलक राजवटीच्या काळात किल्ल्याच्या आत ३० मीटर चांदमिनारही बांधण्यात आला होतामुख्य दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला ‘चांद मिनार’ नावाचा बुरुज आहे. मुस्लिम शासकांनी बांधलेल्या हा टॉवर सुमारे 210 फूट उंच आणि 70 फूट परिघाचा आहे. या चांद मिनाराचे एकूण चार मजले आहेत.


याच भागात ‘मेंढा तोफ’ नावाची तोफ आहे. पंचधातूंनी बनलेल्या या तोफेला ‘मेंढी तोफ’ असेही म्हणतात. मेढा तोफेजवळच १८० खांबांचे हेमाडपंथी मंदिर आहे. 1950 मध्ये लोकांनी स्वेच्छेने येथे भारतमातेची मूर्ती उभारली.
या मंदिरासमोर 150 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 23 फूट खोल असलेला “हत्ती हौद” किंवा विहीर नावाचा मोठा जलाशय आहे.