Tarun Bharat

महाराष्ट्राचा महेंद्र जागतिक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत

२२ वर्षानंतर अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला मल्ल : गुरुवारी रात्री ९ वाजता इराणच्या मल्लाशी भिडणार

Advertisements

औंध/प्रतिनिधी

जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने बुल्गारिया (सोफिया) येथे सुरू असलेल्या जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धेत तब्बल 22 वर्षानंतर 125 किलो वजनगटात भारताचा तुफानी ताकदीचा बिलवा मल्ल महेंद्र गायकवाडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी रात्री 9 वाजता इराणचा मासुमी वाला याच्याशी भिडणार आहे.

आज अतिशय चुरशीच्या लढतीत महेंद्रने सुरवातीला तुर्कीच्या मिसीरीसी याला सहा विरुद्ध चार गुणानी पराभूत केले. सेमी फायनल मध्ये उझबेकीस्तानच्या अब्दुरर्शीदोव याला एकतर्फी पराभवाची धूळ चारली त्याने तब्बल सहा गुण मिळवले मात्र महेंद्रच्या आक्रमक पवित्र्यामुळे कझाकिस्तानच्या मल्लाला खाते देखील उघडता आले नाही.

महेंद्र पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात

अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तब्बल 22 वर्षानंतर खुल्या गटातून जागतिक ज्युनिअर कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा महेंद्र महाराष्ट्रातील पहिलाच पैलवान आहे.

गेल्या महिन्यात पनामा (बहारीन) येथे झालेली 15 आणि 20 वर्षाखालील एशियन चँम्पियनशीप स्पर्धेत महेंद्रने रौप्यपदक जिंकले होते. तो मूळचा सांगोला तालुक्यातील शिरसीचा आहे. महाराष्ट्रातील तमाम कुस्तीशौकीशांच्या नजरा उद्या होणाऱ्या अंतिम फेरीतील लढती कडे लागले आहे.

Related Stories

गावसकर म्हणतात षटकात दोन बाऊन्सर्सची परवानगी द्या!

Patil_p

जेव्हा लाईव्ह टीव्हीवर प्रशिक्षक तिला प्रपोज करतो!

Patil_p

सातारा : फुटके तळे येथे वृद्धेची आत्महत्या

Abhijeet Shinde

सातारा : कुळ शेतकरी आंदोलन विसाव्या दिवशीही सुरूच

datta jadhav

दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कप संघात तीन स्पिनर्स

Amit Kulkarni

आर. प्रज्ञानंदची उपांत्य फेरीत धडक

Patil_p
error: Content is protected !!