ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांवर सातत्यानं आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेरलं आहे. राऊत आणि सोमय्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर घोटाळे केल्याचा आरोप केला आहे. तर सोमय्यांच्या घोटाळ्यांची आता प्रकरणेच संजय राऊत यांनी समोर आणली आहेत. तसेच ईडीच्या चौकशीवरसुद्धा संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच आता राऊतांनी सोमय्यांच्या संस्थेला त्या कंपनीकडून मिळालेल्या निधीबाबत प्रश्न केला आहे. ईडीने चौकशी केल्यानंतर त्याच कंपनीकडून मोठी रक्कम सोमय्यांच्या संस्थेला मिळाली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी या संदर्भात एकामागोमाग एक दोन ट्वीट केले आहेत. ‘किरीट का कमाल’ असं म्हणत संजय राऊत म्हणतात, ‘२०१३-१४ साली किरीट सोमय्या यांनी एका कंपनीवर आरोप केले. त्या आधारे २०१६ साली संक्तवसुली संचालनालयानं (ED) संबंधित कंपनीच्या प्रमुखांची चौकशी केली. त्यानंतर २०१८-१९ साली याच कंपनीनं सोमय्यांच्या ‘युवक प्रतिष्ठान’ या संस्थेला भलीमोठी देणगी दिली. हा घटनाक्रम समजून घ्या. हे प्रकरण ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेनं तपास करण्याइतकं गंभीर नाही का?,’ असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी याच आरोपासंबंधित आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरसुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या कंपन्या ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर आहेत. त्यांच्याकडून सोमय्यांच्या संबंधित असलेल्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो कसा? हा काळा पैसा पाढरा करण्याचा डर्टी गेम’ आहे का? असा सवाल करत हिशोब तर द्यावा लागेले असे संजय राऊत म्हणाले आहेत. याबाबत आपण तपास यंत्रणांकडे तडर्टी गेम’क्रार केली आहे. असे राऊत म्हणाले आहेत.