महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि भारत सरकारला महात्मा गांधींचा फोटो चलनी नोटांवरून काढून टाकण्यास उपहासाने सांगितले आहे. त्यांनी आपले मत ट्विटर वरून व्यक्त केले. डिसेंबरच्या सुरुवातीला RBI ने भारताचे डिजिटल चलन, (CBDC) बाजारात आणले. नव्याने सादर करण्यात आलेल्या या ई-नोटेवरून महात्मा गांधींचा फोटो वगळला आहे. याबद्दल महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांनी सराकारचा आणि आरबीआयचा तीव्र निषेध केला. सरकारच्या या कृतीबद्दल व्यंगात्मक टिपण्णी करून त्यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Kejriwal ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांना महात्मा गांधींच्या फोटोसह नवीन चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाच्या प्रतिमा छापण्याचे आवाहन केल्यानंतर वाद निर्माण झाला होता.


next post