Tarun Bharat

धनदांडग्यांसाठीच महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप

प्रतिनिधी/चंदगड

धनदांडग्यांसाठीच महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे. मध्यप्रदेश सरकार ओबीसी आरक्षण देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ शकतेय. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गप्प का? असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांच्या इनाम सावर्डे येथील निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेत आरक्षण दिले आहे. राज्यातले महाविकास आघाडी सरकार मात्र फक्त दिखाऊपणा करत आहे. आतातरी महाविकास आघाडी सरकारने ओबासी आरक्षण मिळवून देऊन आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा सरचिटणीस रविंद्र बांदिवडेकर, सुरेश सातवणेकर, सुनील काणेकर, अशोक कदम, तुकाराम बेनके उपस्थित होते.

Related Stories

कंत्राटी 200 कर्मचाऱयांना आर्थिक हातभार

Archana Banage

गरजूंना धान्य वाटप हा पत्रकार संघाचा पॅटर्न सर्वत्र राबविण्याची गरज :आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर

Archana Banage

पद्मश्री डॉ. अशोक पानगडिया यांचे निधन

Tousif Mujawar

पुणे विभागातील 64 हजार 468 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar

कर्नाटकातून विनापरवाना आलेल्या तरुणांवर कारवाई

Archana Banage

कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य सेवा मोहीम कौतुकास्पद

Archana Banage