महाराष्ट्र- कर्नाटक सीमावदाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूरात आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली असून सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी कोल्हापूर जिल्हा पाठीशी असल्याचे आवाहन महाविकास आघडीच्या नेत्यांनी दिली. येत्या कर्नाटक विधानसभेच्या तोंडावर भाजप ही खेळी असल्याचा आरोपही करण्यात आला.
यावेळी बोवलताना कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, ” यापुर्वी कधीच दोन्ही राज्याच्या राज्यपालांची बैठक झाली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यपालांची बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला समजली पाहिजे. नेमकं या बैठकीत काय घडलं हे समोर आलं पाहिजे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर असून कर्नाटकातील भाजप सरकार जाणार हे त्यांना समजून आलं आहे. त्यामुळे सीमावाद उफाळून नागरिकांचा लक्ष विचलित केले जात आहे. सीमाभागातील मराठी बांधवांना आधार देण्याची भूमिका कर्नाटक सरकारची नाही. प्रकरण कोर्टात असतानाही अशी विधान करता याचा अर्थ भाजपला राजकारण करायचं आहे हे स्पष्ट होतंय. कोल्हापूर नेहमी सीमाभागातील बांधवांना पाठींबा देत आला आहे. भविष्यकाळात देखील कोल्हापूर सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राहील.” असे त्यांनी मत व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कर्नाटक सरकार महाराष्ट्राची कळ काठत असल्याचा आरेप केला. ते म्हणाले, “प्रकरण कोर्टात असताना अशी वक्तव्य आजप्रर्यंत कर्नाटकच्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केली नाहीत. आपली सत्ता येण्यासाठी महाराष्ट्राची कळ काढून कर्नाटकात सत्ता आणू पाहत आहेत.”
“जाणीवपूर्वक भाजपची मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत आहेत. शरद पवार यांना देखील बेळगावमध्ये बंदी घातली होती. पण पवार साहेब आदल्याच दिवशी बेळगावमध्ये पोहचले होते. वेषांतर करून कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते” शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ उपस्थित राहावं. कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. सीमाभागातील नेते देखील याठिकाणी येण्यास विनंती केली जाणार असून छत्रपती संभाजीराजे यांना देखील निमंत्रित केलं जाणार आहे.

