Tarun Bharat

महाविकास आघाडीची सहा मते फुटली, शिवसेनेला कात्रजचा घाट, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी

मुंबई:  अतिशय चुरशीने झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेल्या दाव्यानुसार मोठ्या फरकाने भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांचा दणदणीत विजय झाला आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत झाली. त्यामध्ये धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. दरम्यान महाविकास आघाडीची सहा मते फुटल्याचे स्पष्ट होत भाजपने कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल् मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्याची खेळी यशस्वी झाली असून त्यांच्या विजयाने महाविकास आघाडी, खासकरून शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांचं पुरतं गर्वहरण झालं आहे.
भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना महाविकास आघाडीची काही मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवला आहे. 

दरम्यान, भाजपच्या धनंजय महाडिकांचा हा विजय आणि शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव हा महाविकास आघाडीच्या, खासकरून शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. सहाव्या जागेसाठी मतदान करताना महाविकास आघाडीची सहा मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

आता विधानपरिषदेकडे लक्ष्य
राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणताना भाजपने महाविकास आघाडीची मतं फोडली आहेत. त्यामुळे आता दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. 

धनंजय महाडिक यांच्या विजयाने जिल्ह्यात काय साध्य होणार?

-धनंजय महाडिक कुटुंबात ८ वर्षानंतर पुन्हा गुलाल

-राज्यसभा निवडणुकीच्या विजयाने काढला सततच्या पराभवाचा वचपा

-महाडिक यांच्या विजयाने बंटी विरुद्ध मुन्ना हा संघर्ष जोर धरणार

-सतेज पाटील विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न मुन्ना यांच्याकडून केले जाणार

-आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात महाडिक विरुद्ध पाटील सामना होणार

-गोकुळनंतर राजाराम कारखाना हाती घेण्याच्या बंटी यांच्या मनसुब्याला सुरुंग

-भाजपमुक्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक यांच्या विजयाने भाजपला संजीवनी

-धनंजय महाडिक यांच्या रूपाने भाजपला जिल्ह्यात पहिला खासदार मिळाला

-महाडिक यांच्या विजयाने भाजपला बळ, जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत

कोण आहेत धनंजय महाडिक?

-माजी खासदार असलेले धनंजय महाडिक गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.

-२००४ ला शिवसेना तर २००९ ला अपक्ष म्हणून त्यांनी कोल्हापूर लोकसभेतून निवडणूक लढवली, मात्र या दोन्ही वेळेला त्यांना अपयश आलं

-२०१४ ला राष्ट्रवादीकडून त्यांना लोकसभेसाठी संधी मिळाली आणि ते खासदार झाले, मोदी लाटेत ते विजयी

-आपल्या कार्यकाळात त्यांनी संसद रत्न खासदार म्हणूनही पुरस्कार मिळवले.

-मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे कट्टर विरोधक सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय चा नारा देत धनंजय महाडिक यांचा पराभव केला.

-या पराभवानंतर धनंजय महाडिक यांनी भाजप मध्ये प्रवेश केला

-धनंजय महाडिक युवाशक्ती च्या माध्यमातून महाडिक यांचे काम जिल्ह्याभरात पसरलय

-२०२४ ते लोकसभेचे भाजपचे उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जातय

-मात्र त्याआधीच भाजप नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करत त्यांची उमेदवारी जाहीर केली

Related Stories

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला अमित देशमुखांचा पाठिंबा

Archana Banage

मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण, घटनापीठाकडून निकाल राखीव

Archana Banage

पंतप्रधान हिटलरच्या मार्गाने गेल्य़ास…कॉंग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

Abhijeet Khandekar

उन्नाव : कुलदीप सिंह सेनगरला 10 वर्षांचा कारावास

tarunbharat

कोल्हापूर जिल्ह्यात बळींची संख्या हजाराच्या उंबरठय़ावर

Archana Banage

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दोनों फेल’ : राहुल गांधी

Tousif Mujawar