सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडी मतदार संघातील आमदार दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीला दगाफटका दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी केसरकर यांना येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवणार आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण भोसले यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीत सावंतवाडी नगरपालिकेत महाविकास आघाडीचे पुंडलिक दळवी हे नगराध्यक्षपदाचे तर, विधानसभा निवडणुकीत अर्चना घारे परब या महाविकास आघाडीच्या उमेदवार राहतील. दळवी आणि घारे परब निवडून येतील असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.