Tarun Bharat

सुरळीत वीज पुरवठ्य़ासाठी महावितरण ‘अलर्ट’

महावितरणचे अभियंते, जनमित्र ‘ऑनफिल्ड’ : -खंडीत वीज पुरवठा तत्काळ केला जातोय सुरळीत

प्रतिनिधी/कोल्हापूर

संततधार पाऊस, वादळ वाऱयामुळे जिह्यात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या, झाडे वीज वाहिन्यांवर पडून वीज तारा तुटणे, वीज खांब पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणचे अभियंते, जनमित्र दिवसरात्र ’ऑन फिल्ड’ मेहनत घेत आहेत. तरी ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित झाल्यास संयम राखून सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे.

कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंताअंकुर कावळे यांनी जयसिंगपूर, इचलकरंजी व कुरुंदवाड विभागास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वांना दक्ष राहणेबाबत सूचना दिल्या. आपातकालीन स्थितीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. जयसिंगपूर विभागात दत्तवाड शाखा कार्यालयाच्या जनमित्रांनी घोसरवाड येथे हेरवाड गावचा पाणी पुरवठा योजनेचा पाणी पातळी वाढून रोहित्र पेटी पाण्यात गेल्याने बंद पडला त्या वितरण रोहित्रावरील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जनमित्रांनी पुराच्या पाण्यात उतरून काम केले. एलटी बुशिंगला थेट केबल जोडून वीजपुरवठा चालू करून दिला. शाहूवाडी तालुक्यातील वरुळ शाखा कार्यालयांतर्गत 33/11 केव्ही वरूळ उपकेंद्राच्या 11 केव्ही मनोली गावठाण उच्च दाब वीज वाहिनीचा खांब वरुळेश्वर येथे पडला होता. तो वीज खांब उभारून वीज तारा जोडण्याचे दुरुस्ती काम जनमित्रांनी पूर्ण केले.

चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील कोळूके, म्हाळुंगे,मळवी या तीन गावांचा खंडित वीज पुरवठा जनमित्रांनी पावसात, अंधारात काम करून तो सुरळीत केला. 220 केव्ही हलकर्णी अति उच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱया 33 केव्ही तुडिये वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड होऊन ती बंद पडली. डोंगराळ, चिखलमय भात व ऊस शेती भागातून ही 15 किलोमीटर लांबीची वीज वाहिनी गेली आहे. तातडीने बिघाड शोधण्याचे काम सुरू केले गेले. वीज खांब ते वीज खांब पाहणी करून देकोळी गावाजवळील आयसोलेटर स्वीच पर्यंत वीज वाहिनीचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु तो पुन्हा बंद पडला. तुडिये गावठाणच्या 11 केव्ही उच्च दाब वीज वाहिनीला तात्पुरत्या स्वरूपात 11 के व्ही वैजनाथ उच्चदाब वाहिनीद्वारे वीज पुरवठा देऊन पर्यायी व्यवस्था करून वीज पुरवठा सुरळीत केला गेला. मात्र कोळूके, म्हाळुंगे,मळवी ही तीन गावे अंधारात होती. सकाळच्या वेळी पुन्हा 33 केव्ही तुडिये वीज वाहिनीवरील तांत्रिक बिघाड शोधून अखेर दुरुस्ती पूर्ण केली.

कोल्हापूर शहरातील शाहूपुरी मस्जिद जवळ लघु दाब वीज वाहिनीवर झाड पडल्याने एक वीज खांब पडला, वीज तारा तुटल्या. 90 ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित झाला. तो पूर्ववत करण्यासाठी रात्रीच्या वेळी महावितरणच्या कर्मचायांनी दुरुस्ती कार्य हाती घेतले. मंगळवार पेठ शाखेतील गोखले महाविद्यालय सिग्नल जवळ 11 के व्ही रेणुका उच्च दाब वीज वाहिनीवर झाड तुटून पडल्याने वीज वाहिनी तुटली. बुम वाहनाच्या मदतीने दुरुस्ती कार्य पार पाडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

अभियंते व जनमित्रांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचे पुणे प्रादेशिक संचालक मा. अंकुश नाळे, कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी कौतुक केले आहे.

मल्हारपेठ येथील वीज पुरवठा तत्काळ सुरळीत
जोरदार वाऱयामुळे मोठे झाड वीज वाहक तारांवर पडल्यामुळे पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ येथील रोहित्र निकामी झाले. त्यामुळे सुमारे 75 टक्के गाव अंधारात गेले. वीजे अभावी गावातील नळ पाणीपुरवठा देखील बंद झाला. यावेळी कळे उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.पी.पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदार विठ्ठल पाटील यांच्या सहकार्याने वीज कर्मचारी देवदास पोवार यांनी त्वरीत दुसऱयाच दिवशी रोहित्र उपलब्ध करून वीज पुरवठा सुरळीत केला.त्यामुळे मल्हारपेठ ग्रामस्थांतून त्यांचे कौतूक होत आहे.

Related Stories

ग्रामीण भागात पालखी सोहळ्याची लगबग थंडावली

Archana Banage

Ichalkaranji : रुकडी स्थानकानजीकचे रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद

Archana Banage

वडगाव येथे रुग्णालयावर दगडफेक करणारे चौघेजण अटकेत

Archana Banage

ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवा

Archana Banage

कोल्हापूर : थेट पाईप लाईन भराव मांगेवाडी जवळ खचल्याने अपघाताचा धोका

Archana Banage

कोल्हापूर : ट्रॅक्टरच्या धडकेत बोरवडेचा मोटरसायकलस्वार ठार

Archana Banage