तरुण भारत

सरस्वती वाचनालयातर्फे सोमवारी महेश काळे यांच्या गायनाची मैफल

प्रतिनिधी /बेळगाव

सरस्वती वाचनालयाच्यावतीने सोमवार दि. 16 रोजी म्हणजेच बुद्ध जयंती दिवशी लोकप्रिय गायक महेश काळे यांच्या गायनाच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनालयाच्यावतीने दरवषी होणाऱया कुमार गंधर्व संगीत संमेलनांतर्गत  केएलईच्या जिरगे सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता ही मैफल होणार आहे.

Advertisements

महेश काळे हे आजचे आघाडीचे गायक असून हिंदुस्थानी शास्त्राrय, लघुशास्त्राrय, नाटय़ व भक्ती संगीतात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. भारतीय शास्त्राrय संगीत व कला या प्रति÷ानची स्थापना करून त्यांनी संगीताचा प्रसार सुरू केला आहे. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटासाठी त्यांना 2016 मध्ये उत्कृष्ट गायकाचा पुरस्कार प्राप्त झाला.

उस्ताद झाकीर हुसेन, त्रिलोक गुरु, शिवमणी अशा कलाकारांसोबत त्यांनी आपली कला सादर केली आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठ, फॉवर्ड विद्यापीठ आदी ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सहा वर्षांपूर्वी ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या शुभारंभप्रसंगी ते बेळगावात आले होते.

वाचनालय व संगीत कला मंच यांच्यावतीने दरवर्षी होणाऱया कुमार गंधर्व संमेलनांतर्गत ही मैफल होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे संमेलन होऊ शकले नाही. त्यामुळे ही मैफल आयोजित करण्यात आली आहे. बेळगावकरांनी मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.  

Related Stories

विद्यार्थ्यांसाठी धान्य वाटप योजना सुरूच ठेवा

Amit Kulkarni

‘त्या’ जोडगोळीची कारागृहात रवानगी

Patil_p

मराठा मंदिरात साडी प्रदर्शनाला प्रारंभ

Amit Kulkarni

गावकऱयांवर दाखल फिर्यादीची उपनिरीक्षकांकडून शहानिशा

Amit Kulkarni

काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्णय

Patil_p

भाग्यनगर येथे झाडांची पुन्हा कत्तल

Patil_p
error: Content is protected !!