Tarun Bharat

केराची टोपली दाखवून उपमुख्यमंत्र्यांनी…बंडखोर आमदाराचा अजित पवारांवर गंभीर आरोप

Advertisements

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी पुकारलेल्या बंडात आमदार, माजी आमदार यांनी सामील होत. मविआतून बाजूला व्हा असा पवित्रा घेतला. आमदारांना कश्या पध्दतीची वागणूक दिली गेली हे देखील सांगितले. मात्र तुमचे जे म्हणणे आहे ते तुम्ही मुंबईत येऊन मांडा अशी भुमिका शिवसेनेन घेतली आहे. दरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर सातारा कोरेगाव येथील शिवसेना आमदार महेश शिंदेयांचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी बंडखोरीचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे होय असा थेट आरोप केला आहे.

या व्हिडिओत महेश शिंदे (Mahesh shinde) म्हणतात, वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आम्ही सर्व शिवसेना आमदार एकत्र होतो. त्या बैठकीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना सर्व अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी आम्हाला मतदारसंघासाठी किती पैसे दिले याचे आकडे मागितले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर चुकीचे आकडे दिले. त्यांनी दिलेले आकडे आणि आम्ही सांगितलेले आकडे पाहून मुख्यमंत्री सुद्धा अचंबित झाले. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. पण त्यामध्ये काही बदल झाला नाही.

हेही वाचा- तोडफोडीनंतर तानाजी सावंतांचा शिवसेनेला इशारा;म्हणाले,औकातीत रहा…

निधी वाटपावरुन देखील दुजाभाव करण्य़ात आला. शिवसेनेच्या आमदारांना ५० कोटी तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ७०० कोटी निधी देण्यात आला होता. आम्ही पराभव केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाही आमच्यापेक्षा जास्त निधी उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आला होता. त्यांना निधीही दिला जात होता आणि आम्हाला कुठल्याही कार्यक्रमांना बोलवले जात नव्हते. आमच्या तीन बैठका मुख्यमंत्र्यांसोबत झाल्या. त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की यामध्ये सुधारण करण्यात येईल. बऱ्याच गोष्टींना त्यांनी स्थगिती दिली पण उपमुख्यमंत्र्यांनी ते ऐकले नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीला केराची टोपली दाखवून उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये विरोधकांची विकासकामे केली. अशा पद्धतीचे काम सातत्याने चालू राहिले अशी खेंत त्यांनी व्यक्त केली.


हेही वाचा-एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं; नावात हिंदू हृदय सम्राटांचा उल्लेख

राष्ट्रवादीकडून मला पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जात होते. एका बाजूला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम हा पक्ष करत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे माझ्या मतदारसंघात आले आणि त्यांनी जाहीर केले की पुढचा आमदार राष्ट्रवादीचा होईल. शिवसेनेचा आमदार या मतदारसंघात दिसणार नाही. या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना दाखवत होतो. तेही सातत्याने तळमळीने सांगत होते की या गोष्टी थांबतील. पण कुठलीही गोष्ट थांबली नाही. अशा परिस्थितीमध्ये काम करणे आम्हाला अशक्य होते. त्या रागामुळे आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत, असे आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

‘शिवसेनेचा मला जीवे मारण्याचा कट’, सोमय्यांकडून नवा व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री; राऊतांचा शिंदेंना टोला

datta jadhav

राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी; ममता बॅनर्जींनी बोलावली विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक

Abhijeet Shinde

”गंगा अस्वच्छ असल्याने मुख्यमंत्री योगी यांनी गंगेत डुबकी मारली नाही”

Sumit Tambekar

स्टॅंडअप काॅमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन, वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Archana Banage

लोणंद-आदर्की फाटा रस्त्याच्या कामास मंजुरी : खा. उदयनराजे

datta jadhav
error: Content is protected !!