प्रतिनिधी /बेळगाव
अंगडी कॉलेज आयोजित नृत्य उत्सव 2022 आंतरशालेय नृत्य स्पर्धेमध्ये महिला विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकाविला. भरतनाटय़म्मध्ये द्रौपदी वस्त्रहरण व गीता संदेश देणारे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेमध्ये 16 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये द्वितीय क्रमांक चिकोडी येथील अन्नपूर्णेश्वरी स्कूल, तृतीय ओम सेंट्रल स्कूल कब्बूर, भरतेश सेंट्रल स्कूल हलगा व ज्योती सेंट्रल स्कूल बेळगाव यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून रेखा हेगडे व पूजा नागलीकर यांनी काम पाहिले. खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. महिला विद्यालयाच्या नृत्य प्रशिक्षिका सावली चव्हाण व अनुपमा निलजकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.