Tarun Bharat

महिंद्राने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात फॉक्सवॅगनसोबतचे सहकार्य वाढवले

Advertisements

लंडन

  महिंद्रा समूह आणि अग्रगण्य जागतिक वाहन कंपनी फोक्सवॅगन यांनी सोमवारी सांगितले की त्यांनी इलेक्ट्रिक वाहन विभागातील सहकार्य आणखी वाढविण्यासाठी करार केला आहे. दोन्ही कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला भागीदारी करार अधिक सखोल करत मुंबईस्थित ऑटोमेकरच्या नवीन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म इंग्लोसाठी (मॉडय़ुलर इलेक्ट्रिक ड्राइव्ह मॅट्रिक्स) इलेक्ट्रिक घटकांचा पुरवठा करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.

भागीदारीचे उद्दिष्ट 10 लाखांपेक्षा जास्त युनिट्सचे उत्पादन करण्याचे आहे आणि त्यात घटकांसह पाच सर्व-इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या उपकरणांचा समावेश आहे. ‘याशिवाय, भारतीय ऑटोमोटिव्ह बाजाराच्या विद्युतीकरणाला गती देण्यासाठी दोन्ही कंपन्या सहयोगासाठी आणखी संधी शोधतील, ज्यामुळे सर्वसमावेशक धोरणात्मक युतीचा मार्ग मोकळा होईल,’ असे कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

महिंद्राने सोमवारी यूकेमधील बॅनबरी येथे बॉर्न ईव्ही व्हिजन अनावरण कार्यक्रमात आपल्या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही श्रेणीचे अनावरण केले.

इलेक्ट्रिक ‘स्पोर्ट्स युटिलिटी’ वाहन सर्व-नवीन इंग्लो प्लॅटफॉर्म संरचनेवर लॉन्च केले जाईल आणि इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन, बॅटरी सिस्टम आणि बॅटरी सेलसह  घटकांसह सुसज्ज असेल.

सोमवारी, महिंद्राने आपले नवीन इंग्लो ईव्ही प्लॅटफॉर्म आणि दोन ईव्ही ब्रँड अंतर्गत पाच ई-एसयूव्ही वाहनांचे अनावरण केले, यायोगे इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या भविष्यासाठी आपले ध्येय निश्चित करेल असे सांगितले आहे.

Related Stories

झोमॅटोचा महसूल दुप्पट वाढला

Patil_p

हिरोमोटोचा 32 दिवसांमध्ये वाहन विक्रीचा उच्चांक

Patil_p

टाटा पॉवरचे समभाग नकारात्मक वातावरणातही तेजीत?

Patil_p

एअरटेल, वोडाफोनला झटका

Patil_p

आणखीन शक्ती वाढविण्यास जिओची धडपड?

Patil_p

आयटेलचा भारतीय टीव्ही बाजारात प्रवेश

Omkar B
error: Content is protected !!