नवी दिल्ली
महिंद्रा ग्रुप आणि ब्रिटीश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट्स (बीआयआय) यांनी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) क्षेत्रामध्ये 50 कोटी डॉलर (4,00 कोटींहून अधिक) ची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. महिंद्रा समूहाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. महिंद्रा समूह आणि बीआयआय यांच्या करारानुसार, नवीन इलेक्ट्रिक वाहन कंपनीने 2023-24 आणि 2026-27 आर्थिक वर्षांमध्ये त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये एकूण एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.