Tarun Bharat

महिंद्रा ऍण्ड महिंद्राची तिमाहीतील नफा कमाई 2,360 कोटी रुपयांवर

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महिंद्रा अण्ड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने जूनमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 2,360.70 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. कंपनीने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. वाहन निर्मितीमध्ये एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 331.74 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला होता.

महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांनी सांगितले की चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या एप्रिल-जून तिमाहीत त्यांचे उत्पन्न वाढून 28,412.38 कोटी रुपये झाले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षातील याच कालावधीत हा आकडा 19,171.91 कोटी रुपये राहिला होता. या तिमाहीत तिचा एकूण खर्चही 26,195 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी जून तिमाहीत 20,286.24 कोटी रुपये खर्च झाला होता.

सर्व घटकांमधून चांगली कामगिरी वाहन आणि कृषी क्षेत्रातील मजबूत स्थितीमुळे आमच्या सर्व समूह कंपन्यांनी सकारात्मक प्रगती केली आहे, असे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शाह यांनी स्पष्ट केले.

Related Stories

वेदान्ताकडून कोरोनाशी लढण्यास 201 कोटीचे सहाय्य

Patil_p

स्विगीकडून डाइनआऊटचे अधिग्रहण

Amit Kulkarni

कृषी उत्पन्न वाढीसाठी प्रयोगासह तंत्रज्ञानावर भर आवश्यक

Amit Kulkarni

बँक ऑफ बडोदाचे कर्ज झाले स्वस्त

Patil_p

सेन्सेक्समध्ये 1066 अंकांची मोठी घसरण

Patil_p

वायदे बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण

datta jadhav
error: Content is protected !!