Tarun Bharat

महिंद्रातर्फे न्यू बोलेरो मॅक्स पिक-अप सादर

Advertisements

किंमत 8 लाखाच्या घरात : प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वजनाने हलक्मया व्यावसायिक वाहन विभाग (एलसीव्ही)-2 ते 3.5 टन श्रेणीतील अग्रेसर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड(एम अँड एम)ने आधुनिक भारताच्या वाहतूक आणि पुरवठय़ासाठीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भविष्यातील पिकअप्स श्रेणीतील नवीन ब्रँड बोलेरो मॅक्स पिक-अप सादर करत असल्याची घोषणा केली. कंपनीने बोलेरो मॅक्स पिक-अप सिटी-3000 सादर करून ब्रँडचे अनावरण केले. बोलेरो मॅक्स पिक-अप सिटी-3000 आकर्षक वित्त योजना आणि डाऊन पेमेंट 25,000 सह 7,68,000 रुपये (एक्स-शोरूम) पासून किंमतीला उपलब्ध आहे.

बोलेरो मॅक्स पिक-अप हा महिंद्राचा एक नवीन ब्रँड आहे, जो पिकअप विभागामध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करण्यासाठी अभियांत्रिकी आणि डिझाइन केलेला आहे. या पिकअप ब्रँडमध्ये प्रगत कनेक्टेड तंत्रज्ञान iMaXX टेलिमॅटिक्स सोल्यूशन आहे. त्यामुळे प्रभावी वाहन व्यवस्थापन सक्षम होते आणि व्यवसाय उत्पादकता वाढते. सेगमेंट-अग्रणी आराम आणि सुरक्षितता वैशिष्टय़े लांब मार्गांवर ड्रायव्हरची सोय सुविधा पुरवितात. नवीन प्रंट ग्रील (लोखंडी जाळी), नवीन हेडलॅम्प आणि डिजिटल क्लस्टरसह प्रीमियम नवीन डॅशबोर्ड यांसारखी प्रीमियम डिझाइन वैशिष्टय़े व्यावसायिकांना आपण खूप चांगल्या वाहनाचे मालक असल्याचा अभिमान मिळवून देतील.

Related Stories

बॅटरीवरील वाहनांना सवलत

Patil_p

नवीन वर्षात स्कोडा 2.5 टक्क्यांनी किमती वाढविण्याच्या तयारीत

Patil_p

महिंद्राने थार डिझेल वाहने परत मागवली

Patil_p

बीएमडब्ल्यूची नवी स्पोर्टस् कार बाजारात

Patil_p

बाऊन्स स्कूटर वितरण 18 एप्रिलपासून

Patil_p

नवी ‘पियाजिओ वन’ इलेक्ट्रीक दुचाकी लवकरच बाजारात

Amit Kulkarni
error: Content is protected !!