कंपनीची इलेक्ट्रिक कार लाँचिंगपूर्वी मोठी घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिंद्रा अँड महिंद्राने चार्ज प्लस झोन या कंपनीसोबत एक करार केला आहे जी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करते. देशात इलेक्ट्रिक एसयूव्ही वाहनांसाठी चार्जिंग नेटवर्क स्थापन करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कराराअंतर्गत 2,500 हून अधिक जलद-चार्जिंग डीसी चार्जर विविध ठिकाणी बसवले जातील.
या भागीदारीअंतर्गत आगामी काळात कंपनीच्या जागेवर तसेच भाडय़ाच्या जागेवर चार्जिंग स्टेशन्स बसवली जातील. महिंद्रा तसेच त्याच्या सहयोगी आणि समूह कंपन्यांनी निवडलेले इतर कोणतेही स्थानदेखील वापरले जाईल. महिंद्राने अलीकडेच आपली इलेक्ट्रिक कार एक्सयूव्ही400 प्रदर्शित केली, जी अधिकृतपणे पुढील वर्षी जानेवारीमध्ये लॉन्च केली जाणार आहे.
या संदर्भात महिंद्रा आणि चार्ज प्लस झोनमधील भागीदारी महत्त्वाची ठरू शकते. महिंद्रा ईव्हीएसला 25 शहरांमध्ये चार्ज प्लस झोन चार्जर उपलब्ध होणार नाहीत, परंतु कंपनी भाडय़ाच्या साइटसह अनेक ठिकाणी वेगवान डीसी चार्जर्सची स्थापना आणि देखभाल करण्याची योजना आखत आहे.
विजय नाकारा, अध्यक्ष, ऑटोमोटिव्ह क्षेत्र, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड हे म्हणाले, ‘आम्ही भारतामध्ये बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांच्या मोठय़ा प्रमाणात अवलंबनाला गती देण्यासाठी टिकाऊ, किफायतशीर आणि कार्यक्षम असे उपाय आणण्यासाठी काम करत आहोत, याची कार्यवाही सुरू झाली आहे.