वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिंद्रा आणि महिंद्रा यांनी स्पोर्ट्स युटिलीटी गटातील आपली नवी स्कॉर्पिओ क्लासिक कार नुकतीच लॉन्च केली आहे. मागच्यापेक्षा या गाडीच्या इंजिनचे वजन 55 किलोग्रॅम कमी असल्याचे सांगितले जात आहे.
मागच्या गाडीच्या तुलनेमध्ये या गाडीचे मायलेजदेखील 14 टक्के अधिक असल्याचे सांगितले जात आहे. सदर नवी स्कॉर्पिओ क्लासिक गाडी ही दोन व्हेरीयंटमध्ये दाखल करण्यात आली असून एस व्हेरीयंटची किंमत सुमारे 12 लाख रुपये तर एस 11 गाडीची किंमत साधारण 16 लाख रुपये एक्सशोरूम असणार आहे. मागच्या स्कॉर्पिओ सुव्ह या गाडीची ही सुधारित आवृत्ती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या गाडीचे डिझाईन मात्र मागच्या गाडीसारखेच साधारण असल्याचेही कंपनीने सांगितले असून पेस प्रंट ग्रील, फॉक्स स्कीड प्लेट याच्यासह प्रंट बंपर, अपडेटेड फॉगलॅम्प हाऊसिंग अशा सुविधाही मिळणार आहेत. ही गाडी 7 सीटर आणि 9 सीटर या पर्यायात दाखल केली गेली आहे.
इतर फिचर्स
w क्रूझ कंट्रोल, पार्किंग सेन्सर
w दुसऱया रांगेमध्ये एसी व्हेंट्स
w स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्स
w 2 एअरबॅग्ज
w पाच रंगांमध्ये सादर
w 2.2 लिटर जेन-2 एमहॉक डिझेल इंजिन
w मायलेज 14 टक्के अधिक