Tarun Bharat

महिंद्राचा नफा 17 टक्के वाढला

मुंबई

 देशातील दिग्गज ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा यांनी आपल्या चौथ्या तिमाहीचा अहवाल नुकताच सादर केला असून त्यामध्ये कंपनीचा निव्वळ नफा 17 टक्के वाढल्याचे दिसले आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या जानेवारी ते मार्च दरम्यान कंपनीने 1 हजार 167 कोटी रुपये नफा प्राप्त केला आहे. या तुलनेमध्ये मागच्या आर्थिक वर्षात समान अवधीत 998 कोटी रुपये कंपनीने नफ्याच्या रूपात प्राप्त केले होते. दुसरीकडे कंपनीचा महसूल याच कालावधीत 28 टक्के वाढत 17 हजार 124 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो मागच्या वषी 13 हजार 356 कोटी रुपये होता.

11.55 रुपये प्रतिसमभाग लाभांश्ा

युटिलिटी व्हेईकल गटात वाहनांची विक्री 42 टक्के अधिक दिसली आहे. कंपनीने 11.55 रुपये प्रतिसमभाग लाभांश घोषित केलाय.

Related Stories

RBI च्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी

datta jadhav

ऍमेझॉनवर ‘फेमा’ नियम उल्लंघनाचा आरोप

Patil_p

जगासमोर खाद्य संकटासह अन्य समस्या

Patil_p

देशाच्या जीडीपीपेक्षा लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य अधिक

Patil_p

नेस्लेच्या उत्पादनांना छोटय़ा शहरात प्रतिसाद

Patil_p

अन्नधान्याचे उत्पादन दोन टक्क्यांनी वाढणार ?

Amit Kulkarni