पाकिस्तानी सीरिज ‘सदके तुम्हारे’मधून झळकणार
माहिरा खान ‘सदके तुम्हारे’मधून पुन्हा एकदा भारतीय प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज आहे. तिला या सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिने शाहरूख खानसोबत ‘रईस’ चित्रपटात अभिनय करत बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती.
‘सदके तुम्हारे’ची पटकथा खलील-उर-रहमान कमर यांनी लिहिली असून मोहम्मद एहतेशामुद्दीन यांनी दिग्दर्शन केले आहे. हा शो जिंदगी टीव्हीवर प्रसारित होणर आहे.
सदके तुम्हारे एक प्रेमळ आणि साधी प्रेमकहाणी आहे. यातील शाना ही माझी व्यक्तिरेखा असणार आहे. ही व्यक्तिरेखा रोमँटिक आणि खरे प्रेम व्यक्त करणारी आहे. माझ्यासाठी ही सीरिज मनाला भावणारी असल्याचे माहिराने म्हटले आहे.
जिंदगी टीव्हीद्वारे पुन्हा एकदा भारतीय प्रेक्षकांसोबत जोडले जात असल्याने आनंदी आहे. सदके तुम्हारे या सीरिजसह आणखीन एक पाकिस्तानी सीरिज दाखविण्यात येणार असल्याचे तिने म्हटले आहे.