रामदुर्ग येथील कोरवी समाजाचे निवेदन
बेळगाव : गेल्या 40 वर्षांपासून आम्ही रुद्रापूरपेठ रामदुर्ग येथे कोरवी समाजाने दिलेल्या जागेमध्ये रहात आहोत. मात्र आता बेकायदेशीररित्या नोकर संघ ती जागा व घरे कब्जात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत असून याची संपूर्ण चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी शेकऱ्याप्पा रामाप्पा कोरवर आणि इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रामापूर येथील सीटीएस क्र. 1877/2ए या जागेमध्ये गेली अनेक वर्षे आम्ही रहात आहे. ही जागा कोरवी समाजाची आहे. त्यावेळी आम्हाला घरे बांधून राहण्यासाठी ही जागा दिली आहे. मात्र आता बेकायदेशीररित्या नोकरसंघ कब्जात घेण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून आम्हाला सदर जागा आमच्याच कब्जात द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले.