ख्रिसमस सणानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे तसेच वेगवेगळ्या स्वादाचे केक बनवले जातात. या सणाला घरी केक बनवून एकमेकांचे तोंड गोड केले जाते.त्यात चॉकोलेट केक तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.पण घरी ओव्हन नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा केक घरी करता येत नाही. पण ओव्हन शिवाय या ख्रिसमसला घरच्या घरी सॉफ्ट आणि टेस्टी चॉकलेट केक तुम्ही बनवू शकता. जाणून घेऊयात हा केक कसा बनवला जातो.
साहित्य
२ ते ३ कप डार्क चॉकलेट
३ कप कंडेन्स्ड दूध
३/४ कप मैदा
१ कप अक्रोड (बारीक कापलेले)
१ चमचा व्हॅनिला इसेन्स
बटर
कृती
चॉकलेट केक बनवण्यासाठी सर्वप्रथम चॉकलेट आणि बटरला मंद आचेवर ठेवून त्यात २ चमचे पाणी घालून मिक्स करा. आता ते गॅसवरुन उतरवून त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून चांगले मिक्स करा. यानंतर त्यात बारीक कापलेला अक्रोड आणि व्हॅनिला इसेन्स घालून चांगले मिक्स करा. यानंतर तयार मिश्रण ग्रीस केलेल्या कुकरच्या भांड्यात ठेवा आणि थंड होऊ द्या. आता प्रेशर कुकरला शिट्टी न लावता तीन ते चार मिनिटे मंद आचेवर गरम करा. लक्षात ठेवा, आता केक मंद आचेवर ३० मिनिटे शिजवा. यानंतर गॅस बंद करा. कुकरमधील भांडे बाजूला काढून ठेवा आणि थंड करा.यांनतर भांड्यातील केक ताटामध्ये काढून सर्व्ह करा. तुम्ही याला चॉकलेच क्रिम किंवा ड्रायफ्रूट्सने गार्निश करु शकता.

