Tarun Bharat

पावसाळ्यात घरच्या घरी बनवा फक्कड मसाला चहा

तरुणभारत ऑनलाइन

पावसाळ्याच्या दिवसात चहाची चुस्की ही मजाच काय वेगळी आहे. बाहेर पडणारा पाऊस आणि गरमागरम वाफाळणारा चहा एक वेगळचं सुख देतो. आपण घरी सहसा चहा बनवताना आलं, वेलदोडा, गवती चहा असे मसाले वापरतोच. पण कधीतरी बदल म्हणून इतर मसाले वापरयला हरकत नाही. म्हणूनच आज आपण घरच्या घरी चहासाठी मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत.हा चहा चवीचा तर असतोच शिवाय पावसाळ्यात आजरांपासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती देखील यामुळे वाढू शकते.चला मग जाणून घेऊयात हा मसाला कसा तयार करायचा.

साहित्य

1 ते 12 वेलची
1 चमचा लवंगा
1 चमचा काळे मिरे
4 चमचे सूंठ पावडर
4 दालचिनीचे उभे तुकडे
1-2 जायफळांची पूड

कृती

चहा मसाला करताना आधी कढई गरम करायला ठेवावी. सर्व मसाले मंद आचेवर कढईत कोरडेच भाजावेत. कढई गरम झाली की आधी मिरे भाजून घ्यावेत. ते थोडे गरम झाले की लवंगा घालाव्यात. लवंगा गरम होत असतानाच वेलची भाजून घ्यावी.दालचिनीचे तुकडे थोडे बारीक करुन मग भाजण्यास टाकावेत. जायफळ घालणार असाल तर ते भाजण्याची गरज नाही. फक्त त्याचे बत्त्याने चार पाच भाग करुन घ्यावेत. सर्व मसाले बारीक आचेवर पाच ते सात मिनिटं भाजावेत.भाजलेले मसाले थंड झाले की मग ते मिक्सरच्या भांड्यात टाकावेत. त्यातच जायफळाचे तुकडे आणि सूंठ पावडरही घालावी. हे सर्व मिक्सरवर बारीक करुन घ्यावं. मनासारखा चहा मसाला तयार होतो.चार कप चहासाठी एक चमचा मसाला घालून स्वादिष्ट चहा तयार होतो.आपण ही पावडर एका वर्षासाठी हवाबंद कंटेनरमध्ये टिकून राहू शकते.पावसाळ्यात किंवा थंडीत हा मसाला चहा पिण्याचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल..!

Related Stories

शेवया खीर

Omkar B

असा बनवा जेवणाची लज्जत वाढवणारा भाजी मसाला

Kalyani Amanagi

चविस्ट कॉर्न चीज बॉल्स

Amit Kulkarni

वेगळ्या पद्धतीची बटाट्याची कुरकुरीत भजी

Kalyani Amanagi

जगातील पहिला गोल्ड प्लेटेड वडापाव

Amit Kulkarni

ओट्स कुकीज

Omkar B