Gajar Halwa Marathi Tips : थंडीच्या दिवसात बाजारात गाजर सगळीकडे पाहायला मिळतात.तुम्हाला जर गाजराचा हलवा खायला आवडत असेल आणि झडपट गाजर हलवा बनवायचा असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील बनवू शकता. यासाठी गाजर न किसता बनवा झटपट हलवा. कसे चला तर जाणून घेऊया.
साहित्य –
गाजर – दीड किलो
दूध -1 लिटर
साखर- 300 ग्राम
खवा- 250 ग्राम
साजूक तूप -100 ग्राम
वेलची पूड -1 चमचा
काजू, बदाम, पिस्ता काप
सुरवातीला गाजर स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर त्याचे काफ करून घ्या. आता कुकरमध्ये थोडे तुप घालून गाजर 5 मिनिटे परतून घ्या. आता एक वाटी दुध घालून कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्या. यानंतर गाजर थोडे स्मॅश करून घ्या. आता गाजरामध्ये उरलेले दुध घालून चांगेल शिजवून घ्या. शिजवत असताना हलव्याला मधून-मधून मिक्स करत रहा. गाजर आणि दुध एकजीव झाल्यावर त्यात हलवा टाका. आता पुन्हा मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवून घ्या. आता अर्धी वाटी तुप गरम करून त्यात घाला. यानंतर बदाम आणि काडूचे तुकडे तुपात तळून हलव्यात घाला. पुन्हा मिश्रण मिक्स करा. आता गॅस बंद करून गरम गरम हलवा सर्व्ह करा.

