मायकल लोबो यांची सूचना
प्रतिनिधी / म्हापसा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तसेच राज्य सरकारने निवडणूक निर्वाचन अधिकाऱयांना दिलेल्या आदेशानुसार राज्यातील पंचायत निवडणुका घोषित करण्याआधी राज्यातील एकूण 186 पंचायतीतील ओबीसी आरक्षण जाहीर होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
लोबो म्हणाले की, राज्यातील पंचायत निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचे आपण समर्थन व स्वागत करतो.
कळंगूट– कांदोळीत ओडीपी बदलाचा काही फरक पडणार नाही
सरकारकडून मागच्या 5 वर्षात अधिसूचित करण्यात आलेल्या काही ओडीपीत कळंगूट कांदोळीसह बदल करण्यात येणार असल्याचा मंत्री विश्वजीत राणे यांच्या निर्णयाने या भागातील लोकांवर फारसा फरक पडणार नाही. किनारी भागातील लोकांनी आपल्याला जे साध्य करायचे आहे ते मागच्या पाच वर्षात प्राप्त करून घेतलेले आहे. राणे यांना जे काही करायला पाहिजे के करू द्या, असे लोबो म्हणाले.