युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एकमेकांशी निर्णायक चर्चा करुन त्वरित युद्ध थांबवावे आणि शांतता निर्माण करावी, असे आवाहन इंडोनेशियाने केले आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी हे आवाहन केले. युपेनच्या अध्यक्षांनी इंडोनेशियाकडे शस्त्रांची मागणी केली होती. तथापि, ती फेटाळण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या युद्धात कोणत्याही एका देशाला शस्त्रपुरवठा केल्यास युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे युक्रेनची शस्त्रांची मागणी नाकारण्यात येत आहे. इंडोनेशिया हे युद्ध लवकरात लवकर थांबावे या मताचा आहे. या युद्धात आम्ही कोणत्याही एका पक्षाची बाजू घेणार नाही. मात्र, शांततेची पाठराखण करु अशी भूमिका इंडोनेशियाने घोषित केली असून, ती भारताच्या भूमिकेशी मिळती जुळती आहे, असे तज्ञांचे मत आहे. इंडोनेशियाने संयुक्त राष्ट्रसंघातही या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. या त्रयस्थ भूमिकेवर तो देश ठाम आहे.