तरुणभारत ऑनलाइन
Potato Smiley Recipe : पोटॅटो स्माईली हा लहान मुलांचा आवडता पदार्थ आहे.बाहेर गेल्यांनतर लहान मुले स्माईली खाण्याचा हट्ट देखील करतात. पण पोटॅटो स्माईली तुम्ही घरी देखील झटपट बनवू शकता.शिवाय ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे.त्याला आपण वेगवेगळे आकार ही देऊ शकतो.याचबरोबर हा पदार्थ स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे.त्याचे आकार व त्याचा कुरकुरीत पणा पाहूनच मुले आनदी होतात.चला तर मग पाहुयात हे कसं बनवायचं
पोटॅटो स्माईली बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• ४ मध्यम आकारचे उकडलेले बटाटे
• १/२~१ कप पोहे
• १/४ चमचा हळद
• चवीनुसार मीठ
• तळण्यासाठी तेल
कृती :
स्माईली बनवण्यासाठी सर्वप्रथम ४ मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्या. हे बटाटे जास्त उकडलेले नसावेत. बटाटे सोलून बटाटा किसून घ्यावेत. यांनतर पोहे मिक्सर मध्ये फिरवून बारीक एकसारखी पावडर करून घ्या .किसलेल्या बटाट्यामध्ये हळद ,मीठ आणि गरजेनुसार पोह्याची पावडर घालावी. आणि पीठ मळून घ्यावं. यांनतर एक गोळा घेऊन त्याची जाड चपाती लाटून घ्या मग एका छोट्या आकाराच्या वाटीने किंवा छोट्या झाकणाने गोल गोल चकत्या कट करून घ्या.आणि बाकीचे बाजूचे पीठ काढून ठेवा. आता एक कट केलेली चकती घेऊन त्यावर स्ट्रॉने दोन डोळे करून घ्या. व स्माईली आकार देण्यासाठी एक छोटा चमचाच्या साहाय्याने आकार द्या. अश्या प्रकारे सर्व स्माईली बनवून घ्या.एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मंद आचेवर स्माईली तळून घ्या. तळलेल्या स्माईली टिशू पेपरवर ठेवा. आणि गरम गरम स्माईली टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.