Tarun Bharat

घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर

Restaurant Style Matar-Paneer Recipe: पनीर भाजी म्हंटल तर तोंडाला पाणी सुटते. आणि त्यात मटर पनीर असेल तर खाताना आणखीच मजा येते.घरी बनवलेली भाजी रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. कितीही मसाले,पदार्थ त्यामध्ये घातले तरी रेस्टॉरंटच्या मटर-पनीरची चव मिळत नाही. पण काळजी करू नका.आज आम्ही तुम्हाला मटर पनीरची अशी रेसिपी सांगत आहोत,जी एकदम रेस्टॉरंट स्टाईल आहे.

साहित्य

पनीर
हिरवे वाटणे
खडा मसाला
कांदा
टोमॅटो
हिरवी मिरची
काश्मिरी लाल मिरची
आले लसूण पेस्ट
जिरे-धने पावडर
हळद
गरम मसाला
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
तूप

कृती :

रेस्टॉरंट स्टाइल मटर पनीर बनवण्यासाठी प्रथम कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. नंतर हिरव्या मिरच्याही बारीक चिरून घ्या. पनीरचे चौकोनी तुकडे करा आणि तव्यावर तुपामध्ये चांगले भाजून घ्या. त्याच प्रमाणे मटार एका भांड्यात उकळून घ्या. एका प्लेटमध्ये पनीर काढा आणि मटार उकळल्यानंतर ते बाजूला काढून ठेवा.आता हे बनवण्यासाठी कढईत तूप गरम करून त्यात खडा मसाला आणि जिरे टाका. त्यात हिरवी मिरची आणि कांदे घालून चांगले परतून घ्या. कांदा तपकिरी झाल्यावर त्यात टोमॅटो आणि आले-लसूण पेस्ट घाला आणि नंतर थोडे मीठ घाला आणि शिजू द्या. टोमॅटोचे सर्व पाणी सुकल्यावर त्यात मसाले टाका. ७ ते १० मिनिटे चांगले शिजू द्या. तुम्ही ते झाकूनही ठेवू शकता. रेस्टॉरंटची चव हवी असेल तर त्यात किचन किंग मसाला घाला. मसाले चांगले शिजल्यावर त्यात मटार घाला. जर तुम्हाला त्यात रस्सा हवा असेल तर थोडे पाणी गरम करून त्यात घाला. एक उकळी आल्यावर त्यात पनीर टाका. ४ ते ७ मिनिटांनी गरम मसाला घालून मिक्स करा. गरमागरम आणि टेस्टी मटार पनीर चपाती किंवा रोटीसोबत तुम्ही सर्व्ह करू शकता.

Related Stories

उन्हाळ्यात आराम देणारी ही 5 पेये आपण पिली आहेत काय…

Kalyani Amanagi

बदामी पनीर

tarunbharat

कढईमधे बनवा झटपट खुसखुशीत नानकटाई

Kalyani Amanagi

ब्रेड वडा

Omkar B

व्हेज बॉल्स

tarunbharat

पॉट चिकन बिर्याणी

tarunbharat