Tarun Bharat

सरदार्स मैदान केवळ खेळासाठी उपलब्ध करा

इतर कार्यक्रम-समारंभांना फाटा द्या : खेळाडूंची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले सरदार्स मैदान विविध स्पर्धांसाठी तसेच इतर कार्यक्रमांसाठी दिले जात आहे. त्यामुळे दररोज क्रिकेट तसेच इतर खेळ खेळणाऱया स्पर्धकांना अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा खेळ खेळण्यासाठी हे मैदान राखीव ठेवावे, या मागणीसाठी शहरातील क्रिकेटपटूंनी तसेच केजीबी स्पोर्ट्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले आहे.

सरदार्स मैदानावर क्रिकेटबरोबरच ज्ये÷ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. याचबरोबर इतर खेळही त्या ठिकाणी खेळले जातात. या मैदानावर खेळासाठी येणारे खेळाडू हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना इतर ठिकाणी जाऊन खेळणे अशक्मय आहे. तेव्हा हे मैदान क्रिकेट व इतर खेळांसाठी उपलब्ध ठेवावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या मैदानावर कचरा फेकण्यात येतो. याचबरोबर काही तळीरामदेखील मद्य ढोसत असतात. त्यांच्यावर कारवाई करावी. काही प्रदर्शने भरविली जातात. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी कचरा तसाच टाकून देण्यात येतो. तेव्हा याचा सारासार विचार करून मैदान स्वच्छ करावे, तसेच खेळांसाठी हे मैदान राखीव ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. इरफान बयाळ, गंगाधर पाटील, शरद पाटील, सुनील पाटील, पेमनाथ हंगीरगेकर, लाली कोलकार, प्रशांत निळकंठाचे यांच्यासह इतर खेळाडू उपस्थित होते. शेवटी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही मैदानाबाबत माहिती दिली आहे.

Related Stories

तालुक्यातील एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणार नाही!

Amit Kulkarni

गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

Amit Kulkarni

संवेदनेतून साहित्याची निर्मिती

Patil_p

फिरत्या पशुचिकित्सालय वाहनांचा उद्या शुभारंभ

Amit Kulkarni

शिवजयंती-बसव जयंती-रमजान ईद नियमांचे पालन करून साजरे करा

Omkar B

शेड उभारण्यावरून वादावादी

Amit Kulkarni