Tarun Bharat

होळीसाठी बनवा टेस्टी गुजिया

होळी म्हंटल की पुरणाच्या पोळीचा बेत ठरलेलाच असतो.पण अनेक ठिकाणी होळीच्या दिवशी गुजिया बनवण्याची पद्धत आहे. प्रामुख्याने गुजिया हा पदार्थ करंजीसारखाच दिसतो. पण त्याची रेसिपी थोडी वेगळी आहे.शिवाय याची चवही भन्नाट आहे.आज आपण गुजिया बनवण्याची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. ज्यामुळे होळीचा रंग आणखीनच वाढेल.

साहित्य

मैदा – ५०० ग्रॅम
दूध – अर्धी वाटी
मावा – ५०० ग्रॅम
पिट्ठी साखर – ५०० ग्रॅम
रवा – १०० ग्रॅम
मनुका – ५० ग्रॅम
खोबरं : १०० ग्रॅम
वेलची
काजू: १०० ग्रॅम
तूप : ३ चमचे

कृती

गुजिया बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा, दूध आणि तूप एकत्र परातीत घ्या.नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्या. यानंतर थोडावेळ झाकून ठेवा.आता गुजियासाठी सारण तयार करा. यासाठी कढईत मावा हलका भाजून वेगळा काढा.यानंतर कढईत तूप टाकून रवा लाल रंगावर भाजून घ्या. यानंतर मावा, रवा, साखर आणि ड्रायफ्रुट्स एकत्र करून सारण तयार करा.नंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुरीसारखे लाटून घ्या.ही पुरी गुज्याच्या साच्यात ठेवून त्यात दोन चमचे सारण भरून बंद करा.त्याचप्रमाणे सर्व पीठ आणि सारणाच्या गुजिया बनवून कपड्याने झाकून ठेवाव्यात.यानंतर कढईत तूप गरम करून गुजिया मंद आचेवर तळून घ्या. दोन्ही बाजूंनी तळल्यानंतर गुजिया पूर्णपणे तयार आहेत.

Related Stories

उन्हाळ्यात आराम देणारी ही 5 पेये आपण पिली आहेत काय…

Kalyani Amanagi

पॉट चिकन बिर्याणी

tarunbharat

चटपटीत रिंग

Omkar B

हरभरा चाट

Omkar B

काकडी ज्यूस

tarunbharat

जिरा कुकीज

Omkar B