Tarun Bharat

होळीसाठी बनवा परफेक्ट थंडाई

होळीच्या सणाला बऱ्याच ठिकाणी थंडाई पिण्याची प्रथा आहे. अनेक ठिकाणी रंग खेळ्यासोबतच थंडाई पिऊन हा सण साजरा केला जातो. पण थंडाईचे शरीरालाही अनेक फायदे होतात. थंडाईमुळे पोटातील जळजळ, अपचनसारख्या समस्या दूर होतात. आज आपण जाणून घेऊया थंडाई कशी बनवायची.

थंडाई बनवण्यासाठी दूध, काजू, बदाम, पिस्ता, खरबूजचे बिया, बडीशेप, काळी मिरी, वेलची, खसखस, खडी साखर, जायफळ, केशर, वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या लागतात. यासोबत एक सुती कापड लागेल.

थंडाईसाठी पावडर बनवली तर ते बरेच दिवस साठवता येते. यासाठी सर्व साहित्य ग्राइंडरमध्ये ठेवा आणि चांगले ब्लेंड करा. बारीक पावडर होईपर्यंत एकजीव करा. लक्षात ठेवा की जायफळ थोडे कठीण असते, त्यामुळे बारीक करताना समस्या येऊ शकते. म्हणूनच जायफळ किसून टाकता येते.आता थंडाईची पूड तयार झाल्यावर थंडाई बनवणे ही सोपे जाते.यासाठी एका भांड्यावर सुती कापड ठेवा आणि नंतर त्यावर पावडर घाला. पावडरवर हळूहळू थंड दूध घाला. चमच्याने सामग्री चांगली दाबा आणि नंतर काढून टाका. थंडाई तयार आहे, ग्लासमध्ये सर्व्ह करा.

Related Stories

गार्लिक रस्सम

Omkar B

गरम गरम स्वीट कॉर्न टिक्की

Amit Kulkarni

बटाट्याची हटके रेसिपी

tarunbharat

डाळ मसाला वडा

Omkar B

समोसा सँडविच

tarunbharat

झटपट चविष्ट डिश

tarunbharat