Tarun Bharat

हरियाणात माकन यांचा धक्कादायक पराभव

Advertisements

राज्यसभा निवडणूक ः चारपैकी तीन राज्यात भाजप सरस

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राज्यसभेसाठी राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 16 जागांसाठी शुक्रवार, 10 जून रोजी मतदान झाले. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणीस प्रारंभही झाला होता. या चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपने अपेक्षेपेक्षाही मोठा विजय मिळविला आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेसने बाजी मारली. भाजप आणि काँग्रेसकडून एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि तक्रारी झाल्यामुळे हरियाणा आणि महाराष्ट्रात मतमोजणीला विलंब झाला. हरियाणात काँगेसचे उमेदवार अजय माकन यांचा धक्कादायक पराभव झाल्याने काँगेसला मोठा दणका बसला आहे.

राजस्थानमधील राज्यसभेच्या चार जागांच्या निवडणुकीत काँग्रेसने तीन आणि भाजपने एक जागा जिंकली आहे. रणदीपसिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे घनश्याम तिवारीही या निवडणुकीत विजयी झाले. राजस्थानमध्ये क्रॉस वोटिंग झाल्यामुळे भाजपने आपल्या आमदार शोभाराणी कुशवाह यांना निलंबित केले आहे. शोभाराणी यांनी काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांना मतदान केले होते. पक्षाने त्यांना अपक्ष उमेदवार सुभाष चंद्र यांना मतदान करण्यास सांगितले होते.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात पुन्हा जोर धरला आहे. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक अपक्ष आणि इतर पक्ष यांच्यात दुरावा निर्माण होण्याची अपेक्षा ठेवून गेहलोत यांनी आमदारांना पहिले नऊ दिवस उदयपूरमधील रिसॉर्टमध्ये आणि पहिल्या दिवशी जयपूरमधील हॉटेलमध्ये ठेवले. गेहलोत यांनी स्वतः आमदारांशी वैयक्तिक संवाद साधून त्यांची नाराजी दूर केली. गेहलोत यांच्या रणनीतीमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना एकूण 126 मते मिळाली.

राजस्थानात क्रॉस वोटिंगमुळे भाजप आमदार निलंबित

राजस्थानात भाजपने जयपूरमधील रिसॉर्टमध्ये आमदारांना चार दिवस ठेवले होते. प्रत्येक आमदारावर वरि÷ नेत्यांची देखरेख होती. तसेच मतदानविषयक प्रशिक्षणही देण्यात आले. मात्र तरीही भाजपच्या आमदार शोभराणी कुशवाह यांनी क्रॉस वोटिंग करताना काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. भाजप आमदाराच्या क्रॉस वोटिंगमुळे पक्षाच्या अंतर्गत राजकारणात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काँग्रेस नेते पूर्वीपासूनच शोभाराणींच्या संपर्कात होते, असे भाजप नेते अनौपचारिकपणे सांगत आहेत. राज्यातील भाजपच्या काही नेत्यांना याची जाणीव होती, मात्र त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पक्षाने त्यांना निलंबित केले.

हरियाणात भाजपला लॉटरी

हरियाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी भाजपचे कृष्णलाल पनवार आणि भाजप-जेजेपी समर्थित कार्तिकेय शर्मा यांनी निवडणूक जिंकली आहे. कार्तिकेय यांनी दुसऱया फेरीतील मतमोजणीत विजय मिळवला. काँग्रेसचे अजय माकन यांचा फेरमतमोजणीत पराभव झाला. त्यांचे एक मत फेरमोजणीत रद्द झाले. हरियाणातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी झाली. काँग्रेसच्या किरण चौधरी आणि बी. बी. बत्रा यांनी मतांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी पाठवल्या होत्या. भाजप आणि काँग्रेस निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले होते, दोन्ही पक्षांच्या टीमने अधिकाऱयांची भेट घेतली होती.

Related Stories

पलानिसामी हेच अण्णाद्रमुकचे सर्वोच्च नेते

Patil_p

राहुल गांधींच्या प.बंगालमधील सर्व सभा रद्द

datta jadhav

इराणमध्ये रेल्वे अपघात, 10 ठार, 50 जखमी

Patil_p

गुजरात समुद्रहद्दीतून पाकिस्तानी बोट जप्त

Patil_p

जगातील सर्वात क्रूर ड्रग्ज तस्कर जेरबंद

Patil_p

हिजाब प्रकरणावर आज उच्च न्यायालयाचा निकाल

Patil_p
error: Content is protected !!